आंतरराष्ट्रीय स्तरावर वन्यजीव अवयवांची तस्करी फोफावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:22 AM2021-02-06T04:22:33+5:302021-02-06T04:22:33+5:30

गणेश वासनिक अमरावती : आंतरराष्ट्रीय स्तरावर शस्त्रे, सोने, अंमली पदार्थ आणि चौथ्या क्रमांकावर वन्यजीव अशा चार प्रकारची तस्करी फोफावली ...

Trafficking in wildlife is rampant internationally | आंतरराष्ट्रीय स्तरावर वन्यजीव अवयवांची तस्करी फोफावली

आंतरराष्ट्रीय स्तरावर वन्यजीव अवयवांची तस्करी फोफावली

googlenewsNext

गणेश वासनिक

अमरावती : आंतरराष्ट्रीय स्तरावर शस्त्रे, सोने, अंमली पदार्थ आणि चौथ्या क्रमांकावर वन्यजीव अशा चार प्रकारची तस्करी फोफावली आहे. वन्यजीवांच्या तस्करीतून दहशतवादी कारवायांसाठी पैसा जात असून, तो रोखण्यासाठी वनाधिकाऱ्यांसमाेर मोठे चॅलेजिंग आहे. त्यामुळे वन्यजीवांची शिकार झाल्यास त्यामागील मास्टरमाईंड शोधा, तपास स्थानिक स्तरावर गुंडाळू नका, पायेमुळे निखंदून काढा, गाफील राहू नका, असा धोक्याचा इशारा वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटीने ऑनलाईन बेविनारच्या माध्यमातून वनाधिकारी, वनकर्मचाऱ्यांना दिला.

बंगळूरू येथील वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटीच्या विधी प्रशिक्षक प्रदिप्ती भारद्धाज, विधी अधिकारी फाझील पाटील, शुभ्रा सोटे यांनी राज्यात १० प्रादेशिक वनविभागनिहाय वन्यजीव संरक्षण कायद्यांविषयी वनाधिकाऱ्यांना मार्गदर्शनार्थ आराखडा तयार केला आहे. यात नागपूर वनविभागात २१ जानेवारी, चंद्रपूर २७ जानेवारी, अमरावती २९ जानेवारी, तर यवतमाळ वनविभागात ४ फेब्रुवारी रोजी बेविनार मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. अमरावती सर्कलमध्ये वनरक्षक ते सीसीएफ अशा ३१३ जणांनी ऑनलाईन नोंदणी करून सहभाग नोंदविला होता. औरंगाबाद वनवृत्तात ९ जानेवारी रोजी बेविनारचे आयोजन करण्यात आले आहे.

दिल्ली येथील राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने वाघांची संख्या वाढत असली तरी वाघांची शिकार, अवयवांची आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्री, स्थानिकांचा शिकारीत सहभाग, वन्यजीव संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. त्यानंतर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटीने वन्यजीव तस्करी, वन्यजीव संरक्षण कायदाच्या कठोर अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे. वन्यजीवांची शिकार झाल्यानंतर या घटनेमागील कडी शोधण्यासाठी शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसे पोहचता येईल,या दिशेने तपास करून संबंधिताला जेरबंद करण्यासाठी वनाधिकाऱ्यांनी ‘मायक्रो प्लॅंनिंग’ करावे, असे बेविनारमधून स्पष्ट करण्यात आले.

०००००००००००००

२१ प्रकारच्या वन्यजीवांच्या अवयवांची होती तस्करी

भारतीय वन्यजीव अनुसूची क्रमांक १ नुसार देशभरात २१ प्रकारच्या वन्यजीव, वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी होते. यात वाघ, बिबट, सिंह, रानगेंडा, खवले मांजर, मुंगूस, मोर, हरिण, रोही, अजगर, नाग, हत्ती, पानगेंडा, गवा, समुद्रकासव, मगर, गुलाबी डोक्याचे बदक, गरूड गिधाळ, पाणघोरपड, माळढोक आदींचा समावेश आहे.

०००००००००००००

कोट

वाघ, बिबटच नव्हे, तर २१ प्रकारच्या वन्यजीवांच्या संरक्षणाबाबत केंद्र सरकारने अलर्ट केले आहे. त्याअनुषंगाने राज्यात १० प्रादेशिक सर्कलमध्ये बेविनारच्या माध्यमातून वनरक्षक ते सीसीएफपर्यंत वन्यजीवांचे संरक्षण, कायदयांबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

- एस. युवराज., प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर

Web Title: Trafficking in wildlife is rampant internationally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.