शिक्षणाच्या रूळावर परतली विद्यार्थ्यांची गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:11 AM2021-07-01T04:11:05+5:302021-07-01T04:11:05+5:30

अमरावती : शासनाच्या कारोना प्रतिबंधात्मक उपायोजना कायम असताना विद्यार्थ्यांची एकमेकाला खेटून उभी असलेली गर्दी बुधवारी प्रत्येक महाविद्यालयात पहायला मिळाली. ...

The train of students returned to the path of education | शिक्षणाच्या रूळावर परतली विद्यार्थ्यांची गाडी

शिक्षणाच्या रूळावर परतली विद्यार्थ्यांची गाडी

Next

अमरावती : शासनाच्या कारोना प्रतिबंधात्मक उपायोजना कायम असताना विद्यार्थ्यांची एकमेकाला खेटून उभी असलेली गर्दी बुधवारी प्रत्येक महाविद्यालयात पहायला मिळाली. तिसरी लाट त्याच्यावरच ओसणार असल्याचे संकेत शासन - प्रशासनाकडून वांरवार मिळत असतानाही शिक्षणाच्या ओढीने त्याकडे दुर्लक्ष केले. महाविद्यालय प्रशसानही ही गर्दी आवरण्यास अपयशी ठरली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ पहिल्या सत्रातील हिवाळी परीक्षांचे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर ते ऑफलाईल शुल्कासह महाविद्यालयात भरावयाचे होते. त्याकरिता महाविद्यालयात विद्यार्थांनी एकाच वेळी गर्दी केली होती. प्रशासनाच्यावतीने सामाजिक अंतर न पाळल्यास ७०० रुपये दंड कायम ठेवला आहे. मात्र, हे सर्व विद्यार्थी एकमेकांना खेटूनच उभे होते.

महाविद्यालय प्रशासन व विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा अर्ज भरण्याकरीता योग्य नियोजन करायला हवे. प्रत्येक विद्यार्थ्याने या भयंकर गर्दीबाबत नाराजी व्यक्त केली. परंतु, मार्ग नसल्यामुळे रांगेत उभे राहावे लागले. कोरोना संसर्गाची भीती कायम आहे. याबाबत महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांचे योग्य नियोजन करणे गरजेचे होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

सहा दिवसात परीक्षा शुल्क भरून घेण्याचे विद्यापीठाचे आदेश

--------------------------------------------------------------------------------------------------

कोट--

अनेक विद्यार्थी शहराबाहेरील आहेत. परीक्षा शुल्क भरण्याकरिता पुन्हा दुसऱ्या दिवशी यावे लागतात. यामुळे ते नाईलाजास्तव रांगेत लागले. गुरुवारी उपाययोजना करण्यात येईल.

देशमुख, प्राचार्य, शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय

Web Title: The train of students returned to the path of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.