धामणगावात ८२० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:08 AM2021-01-01T04:08:45+5:302021-01-01T04:08:45+5:30
धामणगाव रेल्वे : १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या तालुक्यातील ५५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात ८२० अधिकारी व कर्मचाऱ्यांना ...
धामणगाव रेल्वे : १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या तालुक्यातील ५५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात ८२० अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन ठिकाणी टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात आले.
तालुक्यात १८८ मतदान केंद्र आहेत. मंगळवारी सकाळी पहिल्या टप्प्यात स्थानिक आदर्श महाविद्यालय व धामणगाव अभियांत्रिकी महाविद्यालयात टप्प्याटप्प्याने ८० अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी गौरवकुमार भळगाटीया व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश मंडपे, नरेश इंगळे यांनी प्रशिक्षण दिले. प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी एक, दोन, तीन यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडावी, यासाठी हे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भळगाटीया यांनी दिली. ग्रामपंचायत निवडणूक व कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता ८२० कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर यांनी यासंदर्भात ग्रामीण रुग्णालय परिसरात वैद्यकीय चमू तयार ठेवली आहे.
----------------------------------------