दोन दिवसात १६० कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:13 AM2021-07-29T04:13:46+5:302021-07-29T04:13:46+5:30
अमरावती : जिल्हा परिषदेच्या गट ‘क‘ व गट ‘ड‘ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सोमवार २६ जुलैपासून सुरू झाल्या आहे. ...
अमरावती : जिल्हा परिषदेच्या गट ‘क‘ व गट ‘ड‘ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सोमवार २६ जुलैपासून सुरू झाल्या आहे. बदली प्रक्रियेच्या दोन दिवसात विविध विभागातील १६० अधिकारी, कर्मचाऱ्यांचे विविध ठिकाणी जिल्ह्यांतर्गत स्थानंतरण करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बदली प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी पशुसंवर्धन विभागातील ९,सिंचन ४,बांधकाम १०,कृषी३,वित्त विभागातील ६ आणि महिला व बालकल्याण विभागातील ७ अशा ३९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.तर २७ जुलै रोजी रात्री उशिरापर्यत १२१ जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सामान्य प्रशासन विभागातील ४६ आणि पंचायत विभागातील ७५ याप्रमाणे बदल्या केलेल्या आहेत.यात ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी ,विस्तार अधिकारी ,सहायक प्रशासन अधिकारी,कनिष्ठ सहायक,वरिष्ठ सहायक,पशुधन पर्यवेक्षक,जलसंधारण अधिकारी,कनिष्ठ अभियंता,कनिष्ठ आरेखड,स्थापत्य अभियंता,सहायक लेखा अधिकारी,पर्यवेक्षिका,वाहन चालक आदी कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसात बदल्या करण्यात आल्या आहेत. बुधवार २८ जुलै राेजी शिक्षण विभागातील शिक्षक संवर्ग वगळता अन्य व आरोग्य विभागातील बदल्याची कारवाई रात्री उशिरापर्यत ऑनलाईन समुपदेशनव्दारे बदल्याच प्रक्रिया राबविण्यात येत आहे.या सर्व बदल्या सीईओ अविश्यांत पंडा,सामन्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे आदीसह खातेप्रमुखांच्या उपस्थित केल्या जात आहेत.