भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्याच्या बदल्या, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकपदी जयोती बॅनर्जी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:09 AM2021-04-29T04:09:45+5:302021-04-29T04:09:45+5:30
पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती, सीसीएफ प्रवीण चव्हाण यांना मिळाली बढती अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालकपदी जयाेती बॅनर्जी ...
पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती, सीसीएफ प्रवीण चव्हाण यांना मिळाली बढती
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालकपदी जयाेती बॅनर्जी यांची वर्णी लागली आहे. तर, अमरावती वनविभाग (प्रादेशिक) मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांना अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी बढती मिळाली आहे.
भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्याच्या पदोन्नती, बदलीने होणाऱ्या पदस्थापनेबाबत महसूल व वन विभागाने २८ एप्रिल रोजी आदेश निर्गमित केले आहे. हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी निलंबित मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक तथा अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्या जागेवर जयोती बॅनर्जी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गत काही महिन्यांपासून मेळघाट व्याघ्र प्रकल्प संचालकपदी कोणाची वर्णी लागेल, या बाबीला पूर्णविराम मिळाला आहे.
प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव यांची नागपूर येथील महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य, तर जैव विविधता मंडळाचे सदस्य जीत सिंग यांची प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी वर्णी लागली. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास राव यांची नागपूर येथील महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकपदी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक संजीव गौड यांची नागपूर येथील एफडीसीएम लि.चे मुख्य महाव्यवस्थापक, अमरावतीचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांची अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी बढती, ठाणे येथील मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे यांची अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व केंद्रस्थ अधिकारीपदी बढती, यवतमाळ येथील मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामराव यांची ठाणे येथे त्याचपदावर बदली, नाशिक येथील वनसंरक्षक पी.जे. लोणकर हे यवतमाळ येथे बदली, पुणे येथील वनसंरक्षक एस.एस. गुजर यांची औरंगाबाद येथे, नंदूरबार येथील उप वनसंरक्षक एस.बी. केवटे यांची पुणे येथे बदली, सांगली येथील उपवनसंरक्षक पी.बी. धानके यांची ठाणे, नागपूर येथील (भूमी अभिलेख) चे उपवनसंरक्षक व्ही. एम. गोडबोले यांची वनसंरक्षकपदी बढती, नागपूर येथील उपवनसंरक्षक एस.डी. वाढई यांची वनसंरक्षकपदी बढती, कुंडल येथील प्राध्यापक सी.एल. धुमाळ यांची ठाणे येथे उपवनसंरक्षकपदी बढती, वडसा येथील उपवनसंरक्षक निरंजन विवरेकर यांची गुगामल वन्यजीव येथे बदली, अहमदनगन येथील उपवनसंरक्षक एम. आदर्श रेड्डी यांची मुंबई येथील विभागीय वन अधिकारीपदी बढती, नागपूर येथील उपवनसंरक्षक प्रभू नाथ शुक्ला यांची बल्लारशा येथे बदली, विनीता व्यास यांची नागपूर येथे उपवनसंरक्षकपदी नियुक्ती, सातारा येथील उपवनसंरक्षक भरत सिंह हाडा यांची नागपूर येथे बदली,रोहा येथील उपवनसंरक्षक राकेश सेपट यांची वर्धा, अकोला येथील वन अधिकारी यांची सांगली येथे उपवनसंरक्षकपदी बदली, अलिबाग येथील विभागीय वन अधिकारी अप्पासाहेब निकत यांची रोहा येथे बदली, कराड येथील विभागीय वनाधिकारी एम.एन. मोहिते यांची सातारा येथे बदली, ठाणे येथील एफडीसीएमचे विभागीय व्यवस्थापक कृष्णा भवर यांची नंदूरबार येथे बदली, सातारा येथील विभागीय वन अधिकारी धरमवीर सालविठ्ठल यांची वडसा येथे बदली, सोलापूर येथील सुवर्णा माने यांची अहमदनगर येथे बदली करण्यात आली आहे.