वनपालांना बदल्यांचे वेध, परतवाड्याकरिता २७ वनपाल स्पर्धेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 07:08 PM2019-06-03T19:08:11+5:302019-06-03T19:08:25+5:30

परतवाडा आरएफओ आणि वनपाल हे दोघेही बदलीस पात्र आहेत

transfers, 27 forest fight for returning | वनपालांना बदल्यांचे वेध, परतवाड्याकरिता २७ वनपाल स्पर्धेत 

वनपालांना बदल्यांचे वेध, परतवाड्याकरिता २७ वनपाल स्पर्धेत 

Next

- अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : वनविभागातील वनपालांना सध्या बदल्यांचे वेध लागले आहेत. परतवाडा वनपालपदाकरिता २७ वनपाल स्पर्धेत आहेत. ते आपआपल्या स्तरावर प्रयत्नाची पराकाष्ठा करीत आहेत.
परतवाडा वनपरिक्षेत्रांतर्गत वनपरिक्षेत्र अधिका-यांचे (आरएफओ) व परतवाडा वनपालाचे पद ‘अर्थपूर्ण’ व्यवहारात महत्त्वाचे मानले जाते. अमरावती आरागिरणी वनपालपदाखालोखाल परतवाडा, शेकदरी आणि वरूड वनपालपदाला अमरावती प्रादेशिक वनविभागात चांगलीच मागणी आहे.
परतवाडा आरएफओ आणि वनपाल हे दोघेही बदलीस पात्र आहेत. त्यांनी आपला निर्धारित कार्यकाळ पूर्ण केला आहे. बदलीस पात्र असल्यामुळे ते या ठिकाणी राहण्यास इच्छुकनाहीत, तर परतवाडा वनपालाने बदलीकरिता स्वत:हून अर्ज दिला आहे. याची भनक स्पर्धकांना लागल्यामुळे मागील चार महिन्यांपासूनच ते स्पर्धेत उतरले आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे स्पर्धक थोडे थंडावले होते. पण, आचारसंहिता संपताच स्पर्धकांनी परत डोके वर काढले आहे.
वनमजूर ते वनपाल पदापर्यंत पोहोचत सर्वाधिक सेवाकाळ परतवाड्यातच घालवणाºया एका वनपालाने या स्पर्धेत चांगलीच रंगत आणली आहे. स्पर्धेतील स्पर्धकांच्या नाकीनऊ  आणत परतवाडा वनपालपदी आपणच राहणार असल्याचा दावा ‘त्या’ वनपालाने केला आहे. यात मुख्य वनसंरक्षक (अमरावती प्रादेशिक) यांच्या बंगल्यावर सेवेतील एका वनकर्मचाºयाची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे.

अशीही दहशत
वनमजूर ते वनपालपदापर्यंत पोहोचत आपला सार्वाधिक सेवाकाळ परतवाड्यात घालवणाºया आणि परतवाडा वनपालपदावर प्रबळ दावा करणा-या या वनपालाची चांगलीच दहशत आहे. स्वत:चे हितसंबंध जोपासले गेले, तर चूप आणि जपले गेले नाही, तर आरएफओपासून सर्वांना उघड करण्याची वृत्ती या वनपालाच्या अंगी विकसित आहे.
दरम्यान, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) हे वनमजूर ते वनपाल असा प्रवासपूर्ण करीत सर्वाधिक काळ परतवाड्यात घालवणाºया वनपालाला परत एकदा पाठीशी घालतात की प्रामाणिकपणे बदली मागणा-या बदलीपात्र अर्जदाराला जवळ करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्य वनसंरक्षक कार्यालयाची मेहरनजर
दहशत पसरविणा-या सदर वनपालावर मुख्य वनसंरक्षक कार्यालय चांगलेच मेहरबान आहे. संबंधित वनपाल यापूर्वी चिखलदरा येथे कार्यरत होते. व्याघ्र प्रकल्पाच्या पुनर्रचनेत एकछत्री नियंत्रणांतर्गत चिखलदरा येथील ते पद संपुष्टात आले. तेव्हा त्या वनपालाला धारणी भागात चित्री नर्सरीकडे वर्ग केले गेले. केवळ चार-सहा दिवस तेथे थांबून परत मुख्य वनसंरक्षक कार्यालय (अमरावती मोबाइल) मध्ये त्याला जागा दिली. याकरिता चिखलदरा येथील पद अमरावतीत वर्ग करून घेतले. अमरावती मोबाइलमध्ये असूनही परतवाड्यात थांबून मोबाइल आरएफओसह डीएफओचे अधिकार वापरीत आपली दहशत निर्माण करून अनेक ‘अर्थपूर्ण’ व्यवहार या वनपालाने अल्पावधीतच सिद्धीस नेले आहेत. परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाºयासह त्यांच्या अधिनस्थ कर्मचाºयांच्या कार्यक्षेत्रातही या वनपालाने आपला हस्तक्षेप वाढविला आहे.

प्रादेशिकमध्येच स्पर्धा
वनविभागांतर्गत बदली प्रक्रियेत प्रादेशिक वनविभागातील परतवाडा, शेकदरी, वरूड, अमरावती, आकोटमध्येच स्पर्धा बघायला मिळत आहे. मात्र, व्याघ्र प्रकल्प व सामाजिक वनीकरण विभागासह संशोधन विभागात बदली करून घेण्याकरिता कुणीही इच्छुकनाही आणि यात कुठेही स्पर्धा नाही. 

शासकीय ‘मर्जी’चे धोरण 
शासकीय धोरणानुसार एकाच ठिकाणी किमान तीन वर्षे सेवा देणा-या कर्मचा-याची विभागाबाहेर बदली करण्यात येते. मात्र, वरिष्ठ कार्यालयाकडून वनपालांच्या बदल्या करताना मर्जीतील कर्मचा-यांना त्यांच्या मागणीनुसार विनंती बदली देण्याच्या घटना ताज्या आहेत. विशिष्ट कर्मचा-याला वर्षभरातच बदली देऊन इतर बदलीपात्र वनपालांवर अन्याय करण्याचा प्रकारही जुना नाही.

Web Title: transfers, 27 forest fight for returning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.