राज्यात ५० वित्त लेखाधिका-यांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 07:35 PM2018-05-21T19:35:22+5:302018-05-21T19:35:22+5:30

महाराष्ट्र वित्त लेखा सेवा सहायक संचालक वर्ग-१ संवर्गातील तीन वर्षे सेवाकाळ पूर्ण करणा-या ५० वित्त लेखाधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने वित्त विभागाने १९ मे रोजी शासनादेश जारी केला.

Transfers News | राज्यात ५० वित्त लेखाधिका-यांच्या बदल्या

राज्यात ५० वित्त लेखाधिका-यांच्या बदल्या

googlenewsNext

अमरावती - महाराष्ट्र वित्त लेखा सेवा सहायक संचालक वर्ग-१ संवर्गातील तीन वर्षे सेवाकाळ पूर्ण करणाºया ५० वित्त लेखाधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने वित्त विभागाने १९ मे रोजी शासनादेश जारी केला.

पुणे येथील महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे लेखाधिकारी संजीव शिरस ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांना त्याच जागी मुदतवाढ देण्यात आली. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातील वरिष्ठ लेखाधिकारी महादेव टेळे यांची बेलापूरच्या मजीप्रात समकक्ष पदावर, भंडारा येथील जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम यांची चंद्रपूर येथील स्थानिक निधी लेखा सहायक संचालकपदी, अकोला येथील स्थानिक निधी लेखापरीक्षा सहायक संचालक जनार्दन खोटरे यांची मुंबई शहर व्हर्च्युअल ट्रेझरी सहायक संचालकपदी, ठाणे जिल्हा परिषदेचे वरिष्ठ लेखाधिकारी मनोजकुमार शेटे यांची पनवेल महापालिकेत मुख्य लेखाधिकारी, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त कार्यालय (अमरावती)) चे सहायक संचालक किशोर गुल्हाने यांची नागपूर येथील विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळात, कोल्हापूर येथील जिल्हा कोषागार अधिकारी रमेश लिधडे यांची कोल्हापूर शिवाजी विद्यापीठात उपकुलसचिवपदी, कोल्हापूर स्थानिक निधी लेखा कार्यालयाचे सहायक संचालक धनाजी शिंदे यांची सातारा कोषागार अधिकारी, बीड येथील स्थानिक निधी लेखापरीक्षण सहायक संचालक शिरीषकुमार धनवे यांची सोलापूर महापालिकेत मुख्य लेखाधिकारीपदी, पुणे येथील कृषी आयुक्तालयाच्या सहायक संचालक सुचिता साकोरे यांची पुणे येथील महिला बालविकास आयुक्तालयात बदली झाली. 
नवी मुंबई ठाणे येथील निधी लेखापरीक्षा संचालनालयाचे सहायक संचालक दत्तदास कराळकर यांची बांद्रा येथील सहायक अधिदान व लेखाधिकारीपदी, भंडारा येथील स्थानिक निधी लेखापरीक्षा सहायक संचालक मनीषा शेंडे यांची नागपूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे वरिष्ठ लेखाधिकारी महेशकुमार कारंडे यांची कोल्हापूर कोषागार अधिकारीपदी, नाशिक येथील जिल्हा परिषदेचे वरिष्ठ लेखाधिकारी देवराव म्हस्के यांची नाशिक येथील लेखा व कोषागार सहसंचालक कार्यालयाच्या सहायक संचालकपदी, चंद्रपूर येथील स्थानिक निधी लेखापरीक्षा सहायक संचालक नागसेन बागडे यांची नागपूर येथील लेखा व कोषागारे सहसंचालक कार्यालयाच्या सहायक संचालकपदी, नांदेड येथील जिल्हा परिषदेचे वरिष्ठ लेखाधिकारी राधाकिसन राऊत यांची लातूर येथील कोषागार अधिकारीपदी, नागपूर येथील स्थानिक निधी लेखापरीक्षा सहायक संचालक योगेश जाधव यांची गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी, रायगड जिल्हा परिषदेचे वरिष्ठ लेखाधिकारी राजू लाकूडझोडे यांची रत्नागिरी स्थानिक लेखापरीक्षा सहायक संचालकपदी, औरंगाबाद येथील सहायक संचालक राजेश माने यांची औरंगाबाद महापालिका लेखापरीक्षण उपविभाग-३ येथील सहायक संचालकपदी, मुंबई शहर राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण मंडळाचे सहायक संचालक सुजित देवकर यांची पालघर कोषागर अधिकारीपदी, अमरावती विभागीय आयुक्तालयातील सहायक संचालक प्रकाश दासे यांची अमरावती विभागीय समाजकल्याण कार्यालयात लेखाधिकारी वर्ग-१ पदी, नागपूर जिल्हा परिषदेचे सहायक संचालक अमित अहिरे यांची गडचिरोली कोषागार अधिकारीपदी, अमरावती विभाग सहसंचालक लेखा व कोषागारे सहायक संचालक योगेश क्षीरसागर यांची यवतमाळ स्थानिक निधी लेखा सहायक संचालकपदी, बांद्रा येथील सहायक अधिदान व लेखाधिकारी सुनील मोरे यांची ठाण्याच्या स्थानिक निधी लेखापरीक्षा संचालनालयाच्या सहायक संचालकपदी, मुंबई शहर ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे सहायक संचालक विजयकुमार कलवले यांची मंत्रालयातील नियोजन विभागात लेखाधिकारीपदी, तर पालघर येथील जिल्हा कोषागार अधिकारी विकास खोळपे यांची रायगड जिल्हा परिषदेत उपमुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी बदली झाली. 
यवतमाळ जिल्हा परिषदेचे वरिष्ठ लेखाधिकारी विजय देशमुख यांची अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात लेखा (ताळमेळ) सहायक संचालकपदी, ठाणे येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाचे वित्त अधिकारी मोतीराम रॉड्रिक्स यांची नवी मुंबई सहायक संचालकपदी कोकण विभाग, लातूर येथील कोषागार कार्यालयाचे सहायक संचालक सचिव कवठे यांची उस्मानाबाद जिल्हा परिषदेत उपमुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी, नागपूर रेशीम संचालनालयाचे लेखाधिकारी सीमा नन्होरे यांची नागपूर येथील स्थानिक निधी लेखा संचालनालयात सहायक संचालकपदी, जालना येथील स्थानिक निधी लेखापरीक्षा सहायक संचालक सचिन धस यांची औरंगाबाद सहायक संचालक (प्रशिक्षण), नागपूर येथील स्थानिक निधी लेखा संचालनालयाचे सहायक संचालक प्रशांत वावगे यांची नागपूर येथे स्थानिक निधी लेखा सहायक संचालकपदी, पुणे विभागीय आयुक्तालयाचे सहायक संचालक भाग्यश्री पवार यांची पुणे कृषी आयुक्तालयात सहायक संचालकपदी, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या उपकुलसचिव राजश्री पाटील यांची सातारा जिल्हा परिषदेत उपमुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी, नागपूर विभाग लेखा व कोषागारे सहसंचालक कार्यालयातील सहायक संचालक शुभदा चिंचोळकर यांची नागपूर येथील रेशीम संचालनालयात लेखाधिकारीपदी, नवी मुंबई रायगड महापालिका लेखापरीक्षण कार्यालयातील सहसंचालक अभिजित पिसाळ यांची मुंबई वरळीच्या नगरपरिषद संचालनालयात लेखापरीक्षा अधिकारीपदी, मंत्रालयातील महसूल व वन विभागात भूकंप पुनर्वसन कक्षातील सहायक संचालक सारिका नन्नावरे यांची मुंबई लेखा व कोषागारे संचालनालयात संचालकपदी, नाशिक येथील लेखा कोषागारे सहायक संचालक (प्रशासन) स्वरांजली पिंगळे यांची नाशिक जिल्हा परिषदेत उपमुख्य लेखाधिकारीपदी, सातारा जिल्हा परिषदेचे वरिष्ठ लेखाधिकारी विठ्ठल चव्हाण यांची मुंबई महाराष्टÑ पोलीस महासंचालनालयात सहायक संचालकपदी, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद खोत यांची सिंधुदुर्ग कोषागार अधिकारीपदी,  गोंदिया स्थानिक निधी लेखापरीक्षा सहायक संचालक रमेश कुमारे यांची नागपूर विभागीय समाजकल्याण कार्यालयात सहायक संचालकपदी, नागपूर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे सहायक संचालक शंकर बळी यांची यवतमाळ जिल्हा परिषदेत उपमुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी, तर रत्नागिरी स्थानिक निधी लेखापरिक्षा सहायक संचालक विशाल गाडे यांची नवी मुंबई जीवन प्राधिकरणात वरिष्ठ लेखाधिकारीपदी बदली झाली आहे. 
सिंधुदुर्ग येथील जिल्हा कोषागार अधिकारी अरविंद मोटघरे यांची मुंबईच्या लेखा कोषागार संचालनालयात सहायक संचालकपदी, सिंधुदुर्ग येथील स्थानिक निधी लेखापरीक्षा सहायक संचालक मानसिंह पाटील यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेत उपमुख्य लेखाधिकारीपदी, बांद्रा अधिदान व लेखाधिकारी प्रगती धनावडे यांची मुंबई येथील कोषागार व इतर तांत्रिक बाबी संचालनालयात सहायक संचालकपदी, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे लेखाधिकारी पंकज गिरी यांची पुणे विभागीय आयुक्तालयात सहायक संचालकपदी, पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तालयातील सहायक आयुक्त विजयकुमार जावीर यांची तेथील महाराष्टÑ कृष्णा खोरे विकास महामंडळात वरिष्ठ लेखाधिकारीपदी, पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीचे सहायक संचालक मारुती मुळे यांची पुणे येथील विभागीय समाजकल्याण सहायक संचालकपदी, तर पुणे येथील विद्या प्राधिकरणाचे सहायक संचालक बाळासाहेब पाटील यांची मुंबईच्या वरळी येथील दुग्धविकास आयुक्तालयात सहायक आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. 
बदली झालेल्या सर्व अधिकाºयांना तत्काळ कार्यमुक्त करण्याबाबत निर्देश आहेत. लेखाधिकाºयांनी नवीन पदाचा कार्यभार स्वीकारताच त्यांच्या वैयक्तिक माहितीचा तपशील एचआरएमएसमधील नमुन्यात भरून नवीन कार्यालय प्रमुखामार्फत संचालनालयास सादर करावे, असे वित्त विभागाचे अवर सचिव मा. रा. गांधी यांनी कळविले आहे.

Web Title: Transfers News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.