राज्यात ३९ सहायक वनसंरक्षकांच्या बदल्या, १२ जणांना मुदतवाढ

By गणेश वासनिक | Published: June 1, 2023 05:31 PM2023-06-01T17:31:30+5:302023-06-01T17:32:30+5:30

महसूल व वन विभागाचे आदेश जारी; मच्छिंद्र थिगळे, विद्या वसव यांची ‘घर वापसी’

Transfers of 39 Assistant Conservator of Forests in the state, extension of 12 persons | राज्यात ३९ सहायक वनसंरक्षकांच्या बदल्या, १२ जणांना मुदतवाढ

राज्यात ३९ सहायक वनसंरक्षकांच्या बदल्या, १२ जणांना मुदतवाढ

googlenewsNext

अमरावती : राज्याच्या महसूल व वन विभागाने ३९ सहायक वनसंरक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. सहायक वनसंरक्षक, गट -अ (कनिष्ठ श्रेणी) या बदली झालेल्या एसीएफ यांना तत्काळ बदली ठिकाणी रूजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

बदली झालेल्या एसीएफच्या यादीत जगदिश येडलावार (औरंगाबाद), सोनल कामडी (पूर्व नागपूर), संजय पाटील (जळगाव), जगदिश शिंदे (सातारा), सुरेश साळुंखे (पुणे), तृप्ती निखाते (नाशिक), राजन तलमले (नागपूर), महेश खोरे (चंद्रपूर), आशा भोंग (कोल्हापूर), गिरीजा देसाई (कोल्हापूर), नितेश देवगडे (गडचिरोली), सुरेंद्र काळे (पुणे), संजय मोरे (धुळे), सचिन शिंदे (अकोला), गणेश झोळे (नाशिक), मच्छिंद्र थिगळे (पांढरकवडा), संदीप गवारे (कराड), नरेंद्र चांदेवार (नागपूर), दादा राऊत (नवेगाव नागझिरा), अतुल देवकर (नागपूर), किरण पाटील (जव्हार), बापु येळे (चंद्रपूर),  सुरेंद्र वडोदे (अकोला), पुष्पा पवार (जालना), सुनील शिंदे (हिंगोली), राजेंद्र नाळे (औरंगाबाद), राजेंद्र सदागिर (भंडारा), विद्या वसव (यवतमाळ), सुजीत नेवसे (धुळे), हेमंत शेवाळे (नाशिक), गजानन सानप (वन प्रशिक्षण संस्था, पाल), यशवंत नागुलवार (नागपूर, पेंच), रोशन राठाेड (नागपूर), रणजीत गायकवाड (सांगली), ईद्रजीत निकम (कोल्हापूर), कमलेश पाटील (कोल्हापूर), प्रज्योत पालवे (पुणे) यांचा समावेश आहे.

१२ सहायक वनसंरक्षकांना मुदतवाढ

एकिकडे ३९ सहायक वनसंरक्षकांच्या कार्यकाळ संपुष्टात येताच त्यांची नियमानुुसार बदली करण्यात आली आहे. मात्र, १२ एसीएफ यांना विशेष बाब म्हणून सद्याच्या पदावर मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला आहे. यामध्ये सुभाष दुमारे, दीपक मते, संजय कडू, राजेंद्र कुलकर्णी, श्रीनिवास पाचगावे, मनीषा भिंगे, नंदकिशोर राऊत, विनायक पुराणीक, प्रदीप बुधनवार, डी. वाय. भुरके, डी.एस. दहिभावकर, ज्योती पवार या बदलीपात्र सहायक वनसंरक्षकांना पदावर मुदतवाढ देण्यात आली आहे.

Web Title: Transfers of 39 Assistant Conservator of Forests in the state, extension of 12 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.