अमरावतीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाच पीआयची एक्झिट तर दोन ‘इन’

By प्रदीप भाकरे | Published: July 1, 2024 01:34 PM2024-07-01T13:34:53+5:302024-07-01T13:36:00+5:30

Amravati : अमरावती ग्रामीणमध्ये नव्याने येणार चार निरीक्षक, सीआयडीच्या दिप्ती ब्राम्हणे शहरात

Transfers of Administrative Officers in Amravati; Five PI's exit and two 'in'. | अमरावतीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाच पीआयची एक्झिट तर दोन ‘इन’

Transfers of Administrative Officers in Amravati; Five PI's exit and two 'in'.

अमरावती : राज्यभरातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची सर्वसाधारण व विनंती बदल्यांची यादी ३० जून रोजी सायंकाळी झळकली आहे. त्यानुसार, शहर आयुक्तालयात कार्यरत पाच पोलिस निरीक्षकांची अन्य पोलीस घटकात बदली झाली आहे. तर तीन पोलीस निरिक्षक नव्याने शहर आयुक्तालयात येणार आहेत. सीआयडीच्या उपअधीक्षक म्हणून राजापेठ, वलगाव येथील डेथ इन कस्टडी प्रकरणांचा तपास करणाऱ्या दिप्ती ब्राम्हणे यांची अमरावती शहर आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे.
             

आयुक्तालयातून बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये गुन्हे शाखा युनिट दोनचे पीआय राहुल आठवले यांची यवतमाळ, नांदगाव पेठचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांची अकोला, सायबर ठाण्याच्या पीआय कल्याणी हुमने, पीआय अमिता जयपूरकर आणि पीआय शुभांगी वानखडे यांची नागपूर पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे. ठाणे शहर येथून पीआय सुनील चव्हाण आणि नागपूर शहर येथून पीआय सीमा दाताळकर हे आयुक्तालयात बदलीवर येणार आहेत. दाताळकर यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नागपूर शहरात बदली करण्यात आली होती. त्या पुन्हा शहरात सेवा देणार आहेत.

ग्रामीणमधून तीन पीआयची बदली

नागपूर शहर येथून पीआय अजय आकरे, जात पडताळणी विभागातून पीआय गजानन मेहत्रे, वर्धा येथून पीआय संतोष डाबेराव आणि अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्रातून पीआय अनिल सिरसाट हे चार अधिकारी अमरावती ग्रामीण पोलिस दलात येणार आहे. याचवेळी अमरावती ग्रामीण दलात सध्या कार्यरत असलेले सायबर ठाण्याचे पीआय धीरेंद्रसिंह बिलवाल यांची जालना पोलिस प्रशिक्षण केंद्र, चांदुर रेल्वेचे ठाणेदार अजय अहिरकर यांची विशेष सुरक्षा विभाग आणि पीआय प्रदीप चौगावकर यांची नागपूर पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे बदली झाली आहे. याचवेळी राज्य गुप्त वार्ता विभागाला कार्यरत पीआय रुपाली पोहनकर यांची अमरावती जात पडताळणी विभागात बदली झाली आहे.

Web Title: Transfers of Administrative Officers in Amravati; Five PI's exit and two 'in'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.