शहर, ग्रामीणमधील पीआय, पीएसआयच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:18 AM2021-08-17T04:18:56+5:302021-08-17T04:18:56+5:30
( सुधारित) अमरावती : राज्यपातळीहून होणाऱ्या पोलीस वर्तुळातील बहुचर्चित बदल्या अखेर १४ ऑगस्ट रोजी झाल्या. पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस ...
( सुधारित)
अमरावती : राज्यपातळीहून होणाऱ्या पोलीस वर्तुळातील बहुचर्चित बदल्या अखेर १४ ऑगस्ट रोजी झाल्या. पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांचा या बदलीसत्रात समावेश आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक कैलास पुंडकर यांची वर्धा येथे बदली करण्यात आली. तर, अमरावती ग्रामीणमधील सदानंद मानकर हे शहर आयुक्तालयातील बीडीडीएसचे प्रमुख असतील. शहर आयुक्तालयातील बीडीडीएसमधील पोलीस निरीक्षक जयंत राऊत यांना नाशिक पोलीस अकादमीत पाठविले आहे.
एसीबी अमरावतीचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांची बदली राज्य गुन्हे अन्वेषण विभागात, तर आर्थिक गुन्हे शाखेतील एपीआय अतुल वर यांची बदली अमरावती परिक्षेत्रात करण्यात आली. शहर आयुक्तालयातील एपीआय बाबुराव राऊत यांची नागपूर परिक्षेत्रात, तर लक्ष्मण गवंड यांची बदली राज्य गुन्हे विभागात, तर सतीश इंगळे अमरावती परिक्षेत्रात, अमरावती ग्रामीणमधील मनोज मानकर अमरावती शहरात, प्रज्ञा वाडेकर अमरावती परिक्षेत्रात, शहरातील पंकज कांबळे अमरावती परिक्षेत्रात बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षकांमध्ये अमरावती शहरातील वियज यादव सिंधुदुर्गात, अमरावती ग्रामीणचे संजय डाहके बृह्नमुंबई, नांदगाव पेठचे ठाणेदार गोरखनाथ गांगुर्डे एसीबीत, तर शहरातील पीआय मोहन कदम एसआयडीत गेले आहेत.
पीएसआयमध्येही खांदेपालट
पीएसआय प्रविण पाटील - महामार्ग सुरक्षा पथक, राम गिते - नांदेड परिक्षेत्र, बालाजी पुंड - नांदेड परिक्षेत्र, संतोष गेडाम - अमरावती परिक्षेत्र, राजेन्द्र चाटे - नाशिक परिक्षेत्र, आशिष देशमुख - अमरावती परिक्षेत्र, भारती इंगोले - पुणे शहर, प्रशांत जंगले - मसुप, राम कदम - मिरा भाईंदर, बालाजी लालपालवाले - नागपूर, श्रीकांत नारमोड - मसुप यांची बदली झालेली आहे.