अमरावती विभागातील ६४ शाळा वर्गखोल्याचा दीड कोटीतून कायापालट

By जितेंद्र दखने | Published: November 15, 2023 08:05 PM2023-11-15T20:05:46+5:302023-11-15T20:06:19+5:30

राज्यात समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत १० जिल्ह्यांतील ११४ वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी ३.१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Transformation of 64 school classrooms in Amravati division from one and a half crores | अमरावती विभागातील ६४ शाळा वर्गखोल्याचा दीड कोटीतून कायापालट

अमरावती विभागातील ६४ शाळा वर्गखोल्याचा दीड कोटीतून कायापालट

अमरावती :

राज्यात समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत १० जिल्ह्यांतील ११४ वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी ३.१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये अमरावती विभागातील ६४ वर्गखोल्याकरिता सुमारे १ कोटी ६२ लाख ५० हजारांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांतच शाळाखोली बांधकामाला सुरुवात होणार असून यामुळे विद्यार्थ्यांच्या गैरसोयीचा मार्ग मोकळा होणार आहे.

राज्यात समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत १० जिल्ह्यांतील ११४ वर्ग खोल्यांच्या | बांधकामासाठी ३.१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये अमरावती विभागातील अकोला, वाशिम आणि अमरावती अशा तीन जिल्ह्यातील ६५ वर्ग खोल्याचा कायापालट होणार आहेत. याकरिता १ कोटी ६२ लाख ५० हजार रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. पुढील काही दिवसांतच शाळाखोली बांधकामाला सुरुवात होणार असून यामुळे विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेची अडचण दूर होणार आहे.

राज्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांमधून अपुऱ्या वर्ग खोल्या असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या बसण्याच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नवीन वर्ग खोल्या बांधकामाची मागणी केली जात होती. त्यासाठी जिल्ह्यांनी नवीन बांधकामाचा प्रस्ताव वर्गखोल्यादेखील समग्र शिक्षा अभियानाकडे सादर केले होते. त्यानंतर अभियान कार्यालयाने प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाअंतर्गत शाळा खोल्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. यामध्ये १० जिल्ह्यांत ११४ वर्ग खोल्या बांधल्या जाणार असून त्यासाठी ३.१६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यात २७ खोल्यांसाठी ४६.५० लाख रुपये, अमरावती २६ खोल्यांसाठी ८३ लाख रुपये, तर वाशीम जिल्ह्यात ११ वर्ग खोली बांधकामासाठी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील काही जिल्ह्यात शाळा वर्गखोल्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Web Title: Transformation of 64 school classrooms in Amravati division from one and a half crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.