परप्रांतीय डॉक्टरांचा शिरकाव

By admin | Published: February 21, 2016 12:13 AM2016-02-21T00:13:19+5:302016-02-21T00:13:19+5:30

बोगस डॉक्टरांनी तालुक्यात बस्तान मांडले असून वैद्यकीय प्रॅक्टीससाठी आवश्यक पात्रता त्यांच्याजवळ नसल्यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरूआहे.

Transitory doctor's insertion | परप्रांतीय डॉक्टरांचा शिरकाव

परप्रांतीय डॉक्टरांचा शिरकाव

Next

वरुड तालुका : रुग्णांच्या जीवाशी खेळ, आरोग्य प्रशासन ढिम्म
वरूड : बोगस डॉक्टरांनी तालुक्यात बस्तान मांडले असून वैद्यकीय प्रॅक्टीससाठी आवश्यक पात्रता त्यांच्याजवळ नसल्यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरूआहे. आरोग्याच्या नावावर लाखो रुपयांची माया बोगस डॉक्टरांनी जमविली आहे. अनेकांना अनावश्यक इंजेक्शन देऊन विनाकारण पैसे लाटण्याचा गोरखधंदा हे डॉक्टर करीत आहेत.
वरुड तालुक्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत पाच प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. परंतु काही आरोग्य केंद्रांत वेळेवर सुविधा मिळत असली तरी काही आरोग्य केंद्रांत व अद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक रुगणंना ग्रामीण रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. मात्र आर्थिक तडजोड नसल्यास गावातील झोलाछाप डॉक्टरांकडे जाऊन मिळेल ते उपचार करण्याची वेळ येते. गर्भवती महिलांना प्रसूतीकरिता दवाखान्यात आल्यावर परत वरुडला उपचार घ्यावे लागतात. तालुक्यात बोगस डॉक्टर असल्याचे बोलले जाते. मात्र कोणीही तक्रार करीत नसल्याने वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्यास धजावत नाही. परप्रांतीय डॉक्टरांचे बस्थान अनेक वर्षांपासून तालुक्यात आहे. त्यांनी येथे नागरिकत्व स्वीकारले आहे. यामध्ये अघोरी पद्धतीने उपचार केले जात असल्याचीही ओरड आहे. यात अधिकाधिक गोरगरीब आदीवासी नागरिक भरकटले जातात. अनेक वर्षापासून अनेक बोगस डॉक्टराविषयी कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे यांचे मनोधैर्य उंचावले आहे. डॉक्टरांकडे कम्पाऊंडर म्हणून काम करणारे डॉक्टर असल्याचे सांगतात. (तालुका प्रतिनिधी)

तालुक्यात तपासणी केली असता बोगस डॉक्टर आढळले नाहीत. शासनाच्या निर्देशाप्रमाणे अशा डॉक्टरांनी दवाखान्याची पाटी लावू नये किंवा इतर पॅथीची औषधी किंवा उपचार रुग्णांवर करू नयेत, असा नियम आहे. डॉक्टरांच्या नावापुढे पाटी नसल्याने त्यांना ओळखणे कठीण असते. मात्र, असे कोणत्याही गावात बोगस डॉक्टर आढल्यास आरोग्य विभागसुध्दा बोगस डॉक्टरांवर कारवाई करेल.
- अमोल देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी, वरुड

Web Title: Transitory doctor's insertion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.