सायन्सकोरवरील कचरा हटविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 11:04 PM2019-03-04T23:04:24+5:302019-03-04T23:04:50+5:30
सायन्स कोअर मैदानात पुन्हा टाकण्यात आलेला कचरा 'लोकमत'च्या वृत्ताने उचलला खरा; मात्र तेथे दोन कंटेनर ठेवण्यात आल्याने पुन्हा कचरा टाकला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यावर ठोस निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. असा सवाल उपस्थित झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सायन्स कोअर मैदानात पुन्हा टाकण्यात आलेला कचरा 'लोकमत'च्या वृत्ताने उचलला खरा; मात्र तेथे दोन कंटेनर ठेवण्यात आल्याने पुन्हा कचरा टाकला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यावर ठोस निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. असा सवाल उपस्थित झाला आहे.
शहराच्या मध्यवस्तीत व मध्यवती बसस्थानकालगच सोयीचे असलेल्या सायन्स कोअर मैदानात भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जातात. नामांकित नेत्यांची सभादेखील या मैदानात घेतल्याचा इतिहास आहे. मात्र, काही दिवसांपासून महापालिके अंतर्गत सफाई कंत्राटदारांच्या माध्यमातून या मैदानात रोजचा जमा होणारा कचरा साठविला जात असल्याने या मैदानाच्या योग्यतेचे खच्चीकरण होत असल्याचे दिसून येत आहे. या परिसरात प्रतिष्ठित नागरिकांचे वास्तव्य आहे तसेच ह्यमॉर्निंग वॉकह्णकरिता येथून मोठ्या प्रमाणात नागरिक ये-जा करतात. मात्र त्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. सकाळी मन प्रसन्नतेसाठी नागरिक झोपमोड करून घराबाहेर पडतात. मात्र, येथील स्थितीमुळे त्यांच्या उत्साहावर विरजण पडत असल्याच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल
सायंन्स कोअर मैदानातील कचऱ्याची समस्या ह्यलोकमतह्णने ८ फेब्रुवारी रोजी लोकदरबारात मांडली. याची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने त्वरेने कारवाई केली. त्यामुळे महिनाभर मैदानात स्वच्छता दिसून आली. मात्र, गेल्या आठवड्यात पुन्हा कचरा टाकण्याची मालिका सुरू केल्याने पुन्हा हा मुद्दा ‘लोकमत’ने उचलून धरल्याने पुन्हा याची दखल घेऊन सोमवारी मैदान स्वच्छ केल्याचे दिसून आले.