अमरावती, बडनेरा स्थानकावर प्रवाशांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 12:14 AM2017-08-30T00:14:13+5:302017-08-30T00:14:38+5:30
मुंबईनजीकच्या आसनगाव ते वाशीदरम्यान मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता दुरंतो एक्स्प्रेसचे ९ डबे रुळावरून घसरल्याने ....
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : मुंबईनजीकच्या आसनगाव ते वाशीदरम्यान मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता दुरंतो एक्स्प्रेसचे ९ डबे रुळावरून घसरल्याने अमरावती, बडनेरा रेल्वेस्थानकाहून जाणाºया व येणाºया काही प्रवाशी गाड्या रद्द, तर काही रखडल्या आहेत. यामुळे येथून प्रवास करणाºया प्रवाशांची ऐनवेळेवर धावपळ उडाली. ज्येष्ठा गौरी स्थापनेच्या दिवशीच ही घटना घडल्याने याचा अधिक मन:स्ताप प्रवाशांना सहन करावा लागला.
दुरंतो एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने मंगळवार २९ रोजी सुटणारी विदर्भ एक्स्प्रेस गाडी रद्द करण्यात आली. तसेच अमरावती-मुंबई व सेवाग्राम एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्यातत. तसेच नागपूर-मुंबई-दुरंतो एक्स्प्रेसही रद्द करण्यात आल्याची माहिती बडनेरा स्टेशनचे प्रबंधक आर.डब्ल्यू. निशाने यांनी दिली. सोमवारी रात्री निघालेली नागपूर-दादर एक्स्प्रेस नाशिकपर्यंत गेली. नागपूरकडे येणारी गितांजली एक्स्प्रेस उशिराने धावली. त्याचप्रमाणे इतरही गाड्या उशिराने धावल्यात. मात्र भुसावळपर्यंत जाणाºया पॅसेंजर गाड्या वेळेवर धावल्यात. ज्येष्ठा गौरी ज्या दिवशी बसतात त्याच दिवसावर या गाडीचे डबे घसरल्याने इतरही प्रवासी गाड्यांवर याचा परिणाम झाला. पर्यायाने अमरावती व बडनेरा रेल्वेस्थानकाहून प्रवास करणाºया व इकडे येणाºया प्रवाशांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला. ऐनवेळेवर रद्द झालेल्या गाड्यांचे रिझर्वेशन रद्द करून प्रवास कसा करावा, या द्विधा मन:स्थितीत प्रवासी सापडले होते. ज्या गाडीचे डबे घसरलेत त्या गाडीत काही अमरावतीचे प्रवासीदेखील होते. सुदैवाने कुणालाच दुखापत झालेली नाही, अशी माहिती आहे. लवकरच दोन्ही बाजूने धावणाºया प्रवाशी गाड्या सुरळीत धावतील, अशी माहिती आहे.