राखी पौर्णिमेमुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ, मुंबईसाठी आता १५०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:15 AM2021-08-23T04:15:31+5:302021-08-23T04:15:31+5:30

नोकरी, व्यवसायानिमित्त पुणा, मुंबईला वास्तव्य करीत असलेले भाऊ बहिणीच्या हातून राखी बांधून घेण्याकरिता शहरात येत आहे. तसेच नुकतेच लग्न ...

Travel hike due to Rakhi full moon, now Rs 1500 for Mumbai | राखी पौर्णिमेमुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ, मुंबईसाठी आता १५०० रुपये

राखी पौर्णिमेमुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ, मुंबईसाठी आता १५०० रुपये

Next

नोकरी, व्यवसायानिमित्त पुणा, मुंबईला वास्तव्य करीत असलेले भाऊ बहिणीच्या हातून राखी बांधून घेण्याकरिता शहरात येत आहे. तसेच नुकतेच लग्न झालेले विवाहित बहीण आपल्या भावाला राखी बांधण्याकरिता शहरात दाखल होण्याकरिता धडपडत आहेत. मात्र, रेल्वेचे आरक्षण वेळेत उपलब्ध होत नसल्याने ट्रॅव्हल्सकडे वळताना दिसत आहे. परंतु येथून एकही ट्रव्हल्स मुंबईकरिता उपलब्ध नसल्याने नागपूरहून येणाऱ्या दोनच वाहनात येथील प्रवासी सामावून घेण्यात येत आहे. त्यात सायंकाळी ६.३० वाजता येणाऱ्या वाहनाचे तिकीट १३०० रुपये, ८.१५ वाजता येणाऱ्या ट्रॅव्हल्सचे तिकीट १५ रुपये सांगण्यात येत आहे.

बॉक्स

या मार्गावर ट्रॅव्हल्सची भाडेवाढ

मार्ग आधीचे भाडे आता

अमरावती - मुंबई १३०० १५००

अमरावती - पुणे ७०० ९००

अमरावती - नाशिक ७०० ९००

अमरावती - जालना ५०० ७००

---

ट्रॅव्हल्सची संख्या तेवढीच

मुंबईकरिता दोनच ट्रॅव्हल्स उपलब्ध आहेत. नाशिककरिता ४, पुण्याकरिता ५ ट्रॅव्हल्स उपलब्ध असून भाडे पूर्वीच्या तुलनेत २०० रुपयांनी वाढले आहे.

कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे ट्रॅव्हल्स फारच अल्प प्रमाणात रस्त्यावर धावल्याने प्रवाशांना मोठी किंमत मोजावी लागली.

---

डिझेल दरवाढीमुळे भाडेवाढ

दोन महिन्यापूर्वी डिझेल ९१ रुपये प्रतिलिटर होते. मात्र आता त्यात ८ ते ९ रुपयांनी वाढ झाल्यामुळे प्रवासीभाडे वाढविण्यात आले आहे. बीड येथे पूर्वी ७०० रुपयात जात होतो. मात्र, आता जालनापर्यंतच ७०० रुपये मोजावे लागत आहे.

- डॉ. अमर मोरे, प्रवासी

Web Title: Travel hike due to Rakhi full moon, now Rs 1500 for Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.