‘त्या’ आॅटोचालकाने केले प्रवासांचे दागिने, रोख परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 10:58 PM2018-03-06T22:58:45+5:302018-03-06T22:58:45+5:30
आॅटोरिक्षातील प्रवाशाचे दागिने व रोखीने भरलेली बॅग चालकाने परत करून माणुसकीचे दर्शन घडविले. या कार्याबद्दल नागपुरी गेट पोलिसांनी आॅटोरिक्षाचालकाचा सत्कार केला.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : आॅटोरिक्षातील प्रवाशाचे दागिने व रोखीने भरलेली बॅग चालकाने परत करून माणुसकीचे दर्शन घडविले. या कार्याबद्दल नागपुरी गेट पोलिसांनी आॅटोरिक्षाचालकाचा सत्कार केला.
अंजनगाव सुर्जीतील साजेदाबी अब्दुल रशीद नागपुरी गेट परिसरातून आॅटोरिक्षात बसून जात असताना त्यांची बॅग राहून गेली. त्यांनी बॅग हरविल्याबाबत नागपुरी गेट पोलिसांकडे तक्रार नोंदविली. मंगळवारी १.३० वाजताच्या सुमारास साजेदाबी यांची बॅग घेऊन एक आॅटोरिक्षाचालक नागपुरी ठाण्यात दाखल झाला. शेख वाजीद शेख अजीम (रा. गुलिस्तानगर) असे त्या आॅटोरिक्षाचालकाचे नाव आहे. शेख वाजीदच्या आॅटो क्रमांक एमएच २७ एएफ-२५१४ मधून साजेदाबी जात असताना त्यांची बॅग राहिली होती. ती बॅग शेख वाजीदने परत आणून दिली. त्यामध्ये साजेदाबी यांचे दागिने व तीन हजार मिळून आले. चालकाच्या या कार्याबद्दल पोलिसांनी त्याला बक्षीस दिले. मात्र, त्याने ते स्वीकारले नाही. त्यामुळे पोलिसांनी शेख वाजीदचा पुष्पहार देऊन सत्कार केला.