कोविड केअर सेंटरमध्ये ४५८ रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:12 AM2021-05-22T04:12:48+5:302021-05-22T04:12:48+5:30
अमरावती : पॉझिटिव्ह असूनही गंभीर लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. ...
अमरावती : पॉझिटिव्ह असूनही गंभीर लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. यासाठी १,२९९ बेड उपलब्ध असून, २१ मेपर्यंत या सेंटरमध्ये ४५८ रुग्ण दाखल झालेत. त्यांच्यावर आरोग्य विभागाच्या नियंत्रणात उपचार सुरू आहे. संबंधित रुग्णांना जेवणापासून औषधापर्यंत व वैद्यकीय सुविधा सर्व मोफत दिली जात आहे.
या कोविड सेंटरमधील आतापर्यंत अनेक रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. खासगी हॉस्पिटलमधून हजारो, लाखो रुपये होणार बिलांच्या पार्श्वभूमीवर कोविड सेंटरमधून मोफत सुविधा मिळत असल्याने रुग्णातून समाधान व्यक्त होत आहे.
बॉक्स
लक्षणे व गंभीर नसलेले रुग्ण
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा शहरापेक्षा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत आहे. रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. बहुतांश रुग्णांना लक्षणे नसल्याचे दिसून येत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे बेडची कमतरता भासू लागल्याने जिल्हा परिषदेने विविध तालुक्यांत १६ कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. कोरोना रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. शहरासह ग्रामीण भागात विनाकारण घेणाऱ्यांची मोबाइल व्हॅनद्वारे रॅपिड अँटिजेन टेस्टसुद्धा केली जात आहे..
बॉक्स
कोविड सेंटरमधील बेडची स्थिती
सेंटरचे नाव एकूण बेड दाखल रुग्ण रिक्त बेड
आदिवासी वसतिगृह धारणी ६० २० ४०
आंबेडकर हॉल, अचलपूर ८२ ७७ ०५
पांढरी, अंजनगाव १५० ९३ ५७
बेनोडा, वरूड ६० ०३ ५७
बुरडघाट होस्टेल, अचलपूर १०० ३३ ६७
गर्ल्स होस्टेल, चांदूरबाजार ५० १८ ३२
गर्व्हमेंट होस्टेल, चांदूररेल्वे १०० १८ ८२
सामदा, दर्यापूर ५० ३१ १९
धामणगाव रेल्वे १६० ०६ १५४
गर्ल्स होस्टेल, भातकुली ५० ०७ ४३
होमगार्ड ६० ०३ ५७
नेरपिंगळाई २२ ०७ १५
नांदगाव खंडेश्वर ५० ०७ ४३
समाजकल्याण होस्टेल, मोर्शी १०० १९ ८१
विमवि गर्ल्स होस्टेल १३० ७४ ५६
वलगाव ७५ ४२ ३३
एकूण १२९९ ४५८ ८४१