जखमी, आजारी बेवारस श्वानांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:13 AM2021-03-22T04:13:11+5:302021-03-22T04:13:11+5:30
-------------- फार्मासिस्ट, केमिस्ट बांधवांचे लवकरच कोविड लसीकरण अमरावती : शहरातील फार्मासिस्ट, केमिस्ट बांधवांचे लवकरच कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. ...
--------------
फार्मासिस्ट, केमिस्ट बांधवांचे लवकरच कोविड लसीकरण
अमरावती : शहरातील फार्मासिस्ट, केमिस्ट बांधवांचे लवकरच कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. आमदार सुलभा खोडके यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना याबाबतचे पत्र दिले आहे. केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोशिएशनच्या मागणीची दखल घेत खोडके यांनी पाठपुरावा केला.
------------------------
किसान मोर्चातर्फे भारत बंदचे आव्हान
अमरावती : किसान मोर्चातर्फे २६ मार्च रोजी भारत बंदचे आव्हान करण्यात आले आहे. रविवारी किसान संघर्ष समितीची जिल्हास्तरीय बैठक पार पडली. यावेळी तुकाराम भस्मे, अशोक सोनारकर, रोहन अर्डक आदी उपस्थित होते.
----------------
इर्विन चौकात शहीददिनी अभिवादन
अमरावती : येथील इर्विन चौकात २३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता शहीददिनी स्मृती स्तंभाला अभिवादन करण्यात येणार आहे. अखिल भारतीय किसान मोर्चातर्फे अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. यात आम आदमी पार्टी, भाकप, किसान ब्रिगेड, मराठा सेवा संघ, रिपाइं आदी संघटना सहभागी होतील.
----------------
जातीवाचक शिवीगाळ, तोडफोडप्रकरणी तक्रार
अमरावती : जातीवाचक शिवीगाळ आणि हॉटेलची तोडफोड केल्याप्रकरणी राकेश अग्रवाल, राजू चिरडे, राजू तिजारे यांच्याविरुद्ध नांदगाव पेठ पोलिसांनी गुन्हा नोंदविला. याप्रकरणी राहुल मोहोड (रा. बोरगाव धर्माळे) यांनी तक्रार नोंदविली.