दीड हजार जनावरांवर उपचार
By admin | Published: December 7, 2015 04:48 AM2015-12-07T04:48:30+5:302015-12-07T04:48:30+5:30
तालुक्यातील सहा गावांत १२९ जणावरांच्या विविध आजारांवर शस्त्रक्रिया, सव्वाशे कुत्र्यांना लसीकरण तर दीड
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील सहा गावांत १२९ जणावरांच्या विविध आजारांवर शस्त्रक्रिया, सव्वाशे कुत्र्यांना लसीकरण तर दीड हजार जणावरांची तपासणी करून मोफत उपचार करण्याचा उपक्रम नागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाने राबविला आहे़
धामणगाव पंचायत समितीच्या पुढाकाराने महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठच्यावतीने पिंपळखुटा येथील संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय, जबलपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना यांच्या मदतीने नागपूर पशु वैद्यकीय महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजना शिबिर तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर, पिंपळखुटा, निंबोली, कावली, हिंगणगाव, जुना धामणगाव, अशोकनगर या गावात मागील सहा दिवस राबविण्यात आले़ या शिबिरात पशुरोग निदान, पशुचिकित्सा व वंधत्व निवारण व जनावरांना मोफत औषधोपचार करण्यात आले़ या गावातील जनावरामध्ये आढळणारे परजीवी व बाह्य किटक निर्मूलनाकरिता गोठ्यात फवारणी, गाई व म्हशींची गर्भतपासणी, लहान मोठ्या १२९ जनावरावर शस्त्रक्रिया करण्यात आली़
कार्यक्रमाचा समारोप अशोकनगर येथे झाला़ यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती गणेश राजनकर, सरपंच सीमा गुल्हाने, उपसरपंच राजेंद्र केला पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता एऩपी़ दक्षिणकर, पशुविकास अधिकारी एस़एऩ इंधाने यांची उपस्थिती होती़ तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी उदय देशमुख, एस़एस़ मुंगोना, ए़आऱ वाघ, मनोज धवणे यांचे सहकार्य लाभले़ तब्बल ८५ विद्यार्थ्यांनी शिबीरात सहभाग घेतला होता़ (तालुका प्रतिनिधी)