जिल्ह्यात दीड हजार रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 10:49 PM2018-08-01T22:49:11+5:302018-08-01T22:49:30+5:30

Treatment of one and a half thousand patients in the district | जिल्ह्यात दीड हजार रुग्णांवर उपचार

जिल्ह्यात दीड हजार रुग्णांवर उपचार

Next
ठळक मुद्देखाजेचा कहर : ग्रामीण रुग्णालयात औषधाचा तुटवडा; सुस्तावलेल्या आरोग्य यंत्रणेला आली जाग

मोहन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खाजेने संपूर्ण जिल्हा बेजार झाल्याची वस्तुस्थिती ‘लोकमत’ने बुधवारी लोक दरबारात मांडल्यानंतर सुस्तावलेली आरोग्य यंत्रणा जागी झाली. जिल्ह्यातील खाजेच्या औषधसाठ्याविषयी माहिती जिल्हा प्रशासनाने घेतली.
आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या खाजरोधक २३ हजार ४४० मलमाचे ट्यूब जिल्ह्यातील ५६ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील ३३३ उपकेंद्रांमध्ये वितरित करण्यात आले. किमान ३०० ट्यूब प्रत्येक प्राथमिक आरोग्य देण्यात आले असले तरी या दररोज दहा ते पंधरा खाजेचे रुग्ण औषधोपचारासाठी येत असल्याची माहिती उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
पूर्वी हा आजार कुटुंबातील एखाद्यालाच व्हायचा आणि त्यावर योग्य उपचार घेतल्यानंतर लगेच बराही व्हायचा. पण, आता एकानंतर दुसºयाला, दुसºयानंतर तिसºयाला अशाप्रकारे एकाच कुटुंबातील सर्वांना याची पाठोपाठ लागण होत आहे. त्यामुळे या क्षेत्रातीलच तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य उपचार फायदेशीर ठरणार आहे.
ग्रामीण रुग्णालयांत औषधांचा तुटवडा
तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयात औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने खाजेच्या रुग्णांना आल्यापावली परत जावे लागत असल्याची कैफियत काही रुग्णांनी ‘लोकमत’कडे मांडली. केवळ ‘एव्हील’ ही साधी गोळी देण्याचे काम ग्रामीण रुग्णालयात होते. खाजेच्या ठिकाणी लावण्यासाठी मलम मिळत नसल्याने चट्टे कमी होत नसल्याची माहिती रुग्णांनी दिली.
महागडा उपचार
जिल्ह्यातील खासगी त्वचारोग विशेषज्ञांकडे दीड हजार रुग्ण उपचार घेत आहेत. एका महिन्याला तब्बल एक ते दीड हजारांचे औषध होत असल्याने महागडा उपचार घ्यायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

केमिस्टकडून अँटिफंगल, स्टीरॉइड व अँटिबॅक्टेरियल कॉम्बिनेशन ड्रग्स वापरू नये. रिंगगार्डसारख्या बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या मलमांचा वापर करू नये. कारण काही प्रमाणात दिलासा मिळाल्यानंतर पुन्हा फंगल ईन्फेक्शन होते व त्या जागेवरील चट्टा किंवा लहान फोड वाढत जातो. तज्ज्ञ डॉक्टरांकडून दोन महिन्यांचा परिपूर्ण उपचार आणि दर पंधरा दिवसानंतर तपासणी करून घेणे गरजेचे असते.
- डॉ. वीरेंद्र सावजी,
त्वचाविकार तज्ज्ञ

Web Title: Treatment of one and a half thousand patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.