वादळी पावसाने संत्रासह झाडेही कोलमडली
By Admin | Published: November 13, 2015 12:30 AM2015-11-13T00:30:02+5:302015-11-13T00:30:02+5:30
नजीकच्या उराड शेतशिवारात दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी, गारपिटीमुळे संत्रा झाडे उलमडली. संत्रा मोठा प्रमाणात गळाल्याने संत्रा उत्पादकांना लाखोंचा फटका बसला.
शेतकऱ्यांची मदतीची मागणी : पुसला परिसरात लाखोंचे नुकसान
पुसला : नजीकच्या उराड शेतशिवारात दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी, गारपिटीमुळे संत्रा झाडे उलमडली. संत्रा मोठा प्रमाणात गळाल्याने संत्रा उत्पादकांना लाखोंचा फटका बसला. परंतु महसूल विभागाने नुकसान नसल्याचा अहवाल दिल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. शासनाने सर्वेक्षण करून संत्रा उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.
पुसलालगतच्या उराड शिवारात दोन दिवसांपूर्वी दुपारी साडेतीन ते चार वाजताच्यादरम्यान अचानक वादळी पाऊस आणि गारपीटीने कहर केल्याने संत्राफळे गळाला. संत्रा झाडेही उलमडून पडली. संत्र्याला भाव नसल्याने संत्रा उत्पादक हवालदिल आहेत. या नुकसानाबाबत शेतकऱ्यांनी तहसिलदार यांना निवेदन देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. परंतु तलाठयाने अंशत: नुकसानीचा अहवाल सादर केल्याने शेतकऱ्यांची फसगत होत आहे. प्रत्यक्षात नुकसानीची माहिती न घेता बसल्याजागीच सर्व्हेक्षण केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप असल्याने प्रत्यक्ष शेतात सर्व्हेक्षण करण्याची मागणी करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, याकरिता नुकसानग्रस्त संत्रा उत्पादक गजानन डाहाके, भाऊराव गुल्हाणे, प्रमिला बगाडे, धनराज तडस, रितेश डाफे, शंकर डाहाके, दिनेश डाहाके, निर्मला कांडलकर, वेणू कांडलकर, सुशीला कांडलकर, आकाश डहाके, वसंत डहाके, किशोर डहाके, ललित अळसपुरे, मारोतराव श्रीखंडे या शेतकऱ्यांनी तहसीलदार वरुड यांना निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)