झाडे हिरवीगार; पण वांझोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:29 PM2017-09-11T23:29:39+5:302017-09-11T23:31:13+5:30

यंदाच्या खरिपात जून महिन्यात पावसाच्या प्रदीर्घ दडीने निर्माण झालेल्या ‘मल्टीपल काम्ॅपलेक्स फॅक्टर’ने सोयाबीनचा घात केला.

The trees are green; But the windshine | झाडे हिरवीगार; पण वांझोटी

झाडे हिरवीगार; पण वांझोटी

Next
ठळक मुद्देशेंगाच नाहीत : सदोष बियाणे, कीड, रोगही ठरताहेत कारणीभूत‘मल्टिपल कॉम्प्लेक्स फॅक्टर’ने सोयाबीनचा घात

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या खरिपात जून महिन्यात पावसाच्या प्रदीर्घ दडीने निर्माण झालेल्या ‘मल्टीपल काम्ॅपलेक्स फॅक्टर’ने सोयाबीनचा घात केला. वाढ खुंटली, झाड हिरवेगार दिसत असतानाही सोयाबीन वांझोटे राहिले आहे. सदोष बियाणे, कीड व रोगांचा प्रादुर्भाव देखील सोयाबीनच्या मुळावर उठला आहे. जिल्ह्यात किमान एक ते दीड लाख हेक्टरमधील सोयाबीनला शेंगाच आल्या नसल्याने शेतकºयांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.
यंदाच्या हंगामात जिल्ह्यात तीन लाख २३ हजार ३०० हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत दोन लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. मात्र, जून महिन्यात मृग नक्षत्रापासूनच पावसाने प्रदीर्घ दडी दिली आहे. नंतरही दमदार पाऊस झालाच नाही. त्यामुळे सोयाबीन पिकाची वाढ खुंटली. सुरूवातीच्या काळात तीन आठवडयाचा पावसाच्या खंडाचे परिणाम आता सोयाबीनवर जाणवायला लागले आहेत. झाड हिरवेगार असूनही त्यावर फुले व शेंगा पकडल्याच नाहीत. सदोष बियाण्यांमुळे ‘मोझॅक’चा प्रादुर्भाव झाला. झाड हिरवे दिसते. मात्र, त्यातुलनेत झाडाला शेंगा कमी प्रमाणात लागतात. त्याही खुरटलेल्या व पोचट असतात. या शेंगांमध्ये दाणे भरत नाहीत. सद्यस्थितीत प्रतिकूल हवामानामुळे अळीचा ‘अटॅक’ आहे. ही अळी सोयाबीनची फुले खात असल्याने झाड हिरवे दिसत असले तरी झाडाला शेंगाच लागत नाहीत. आदी कारणांमुळे सोयाबीन पिकावर सध्या आरिष्ट ओढवले आहे. सोयाबीनवरील विषाणू, जिवाणूजन्य रोग, झाडाला नत्र, पलास यांसह ईतर अन्नद्रव्याची कमतरता, पानांवरील बुरशीजन्य ठिपके, मूलकूज, खोडकूज, करपा, अ‍ॅन्थ्रन्कोज व तांबेरा आदी रोग व कीडींमुळे सोयाबीनला एकतर शेंगा लागत नाहीत, लागल्या तर त्या पोचट राहत आहेत. यामुळे शेतकºयांनी वेळीच व्यवस्थापन न केल्यास सोयाबीनचे २५ ते ९० टक्के नुकसान होण्याची शक्यता आहे.

काय आहे ‘मल्टिपल कॉम्प्लेक्स फॅक्टर ?
शेतकºयांनी जून महिन्यात सोयाबीनची पेरणी केली. मात्र, २७ दिवस पावसाचा खंड असल्याने पिकांची वाढ खुंटली. फुले धरलीच नाहीत. पावसाच्या ताणामुळे झाड हिरवेगार दिसत असले तरी शेंगा मात्र कमी आहेत. नंतर झाडांवर फुले येत असली तरी पुढे मान्सून विड्रॉल होत असल्याने तसेच शेंगा परिपक्वहोण्यास ४० दिवसांचा कालावधी लागत असल्याने संरक्षित सिंचनाची सुविधा असल्यासच काही प्रमाणात उत्पादन घेता येईल. मात्र, जिरायती क्षेत्रात याची शक्यता नाही. जुलै महिन्यात पेरणी झालेल्या पिकांवर याचा जास्त प्रभाव नसल्याची माहिती कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिली. हासर्व ‘मल्टीपल कॉम्प्लेक्स फॅक्टरचा’ प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले.
बाष्परोधक ‘पोटॅशियम नायटेÑट’ची फवारणी आवश्यक
अशा प्रतिकूल परिस्थितीत पावसाचा ताण असल्यास झाडावरील शेंगा टिकविण्यासाठी बाष्परोधक पोटॅशियम नायट्रेटची फवारणी आवश्यक आहे. १३:०:४५ हे एक किलो मात्रेमध्ये १०० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हे पोटॅशियम बाष्परोधक असल्यामुळे उन्हापासून सोयाबीनचा बचाव होतो व किमान १५ दिवसांची मुभा मिळते. नायट्रोजन व पालाश शेंगा भरण्यास मदत करतात. झाडांची तहान भागवितात, अशी माहिती कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिली.

Web Title: The trees are green; But the windshine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.