कंत्राटदाराने उचलली 'ती' झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 11:36 PM2017-11-15T23:36:29+5:302017-11-15T23:36:57+5:30

वलगाव मार्गावर रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी शेकडो झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशाने तोडण्यात आली.

'The' trees that the contractor picked up | कंत्राटदाराने उचलली 'ती' झाडे

कंत्राटदाराने उचलली 'ती' झाडे

Next
ठळक मुद्देवाहतुकीचा तिढा सुटला : बांधकाम विभागाने घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वलगाव मार्गावर रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी शेकडो झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशाने तोडण्यात आली. सदर कंत्राटदाराने बुंधे रस्त्याच्या कडेलाच टाकून दिली होती. 'लोकमत'ने हा मुद्दा लोकदरबारात मांडताच सदर झाडे उचलली गेली. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे.
आठ कोटींच्या कामांचा कंत्राट अकोला येथील कंत्राटदाराला मिळाला आहे. ती झाडे तोडल्यानंतर उचलून नेण्याची जबाबदारी सदर कंत्राटदाराचीच असताना येथील विद्युतनगरपासून तर नवसारीपर्यंत झाडे अनेक दिवस तशीच पडून होती. परंतु या मार्गावरून भरधाव येणाºया वाहन चालकांना रात्री सदर खड्डे ही दिसत नसल्याने या ठिकाणी अपघाताची शक्यता वाढली होती. त्यामुळे 'लोकमत'ने हा प्रश्न लोकदराबारात मांडताच काही दोन दिवसांपूर्वी सदर झाडे ही उचलण्यात आली आहे. या ठिकाणी वनविभागाची परवानगी घेणे गरजेचे होते.
झाडे उचलण्याची रीतसर प्रक्रिया केल्यानंतर या ठिकाणावरून कापलेले झाडे हटविण्यात आल्याने या मार्गावरील समस्या आता सुटली आहे. या मार्गावरील चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे.

वनविभागाच्या परवानगीसाठी ती झाडे उचलण्याचे काम थांबले होते. सदर कंत्राटदराला सूचना देऊन तोेडलेली झाडे उचलून नेण्यात आली आहे.
- सदानंद शेंडगे,
कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग

Web Title: 'The' trees that the contractor picked up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.