नंदनवनाच्या हिरवाईची पर्यटकांना ओढ

By admin | Published: July 10, 2017 12:06 AM2017-07-10T00:06:05+5:302017-07-10T00:06:05+5:30

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर महिन्याभरापासून पर्यटकांनी गर्दी केली असून पाऊस बेपत्ता असल्याने पर्यटक निराश मनाने परतत असल्याचे चित्र आहे.

Tremendous tourists want to attract visitors | नंदनवनाच्या हिरवाईची पर्यटकांना ओढ

नंदनवनाच्या हिरवाईची पर्यटकांना ओढ

Next

निराशा : धबधबे आटले, गर्दी वाढली, आता पावसाची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर महिन्याभरापासून पर्यटकांनी गर्दी केली असून पाऊस बेपत्ता असल्याने पर्यटक निराश मनाने परतत असल्याचे चित्र आहे. शनिवार, रविवार सलग दोन दिवस सुट्या आल्याने पर्यटकांनी चिखलदऱ्यात गर्दी केली होती. मात्र, पावसाने हजेरी न लावल्याने निराश होऊन अनेक पर्यटक परतले.
पावसाअभावी येथील प्रसिद्ध भीमकुंड, जगाडोह, देवी पॉर्इंट, पंचबोल पॉर्इंटवर हजारो फुट उंचावरुन कोसळणाऱ्या धबधब्यांचे विलोभनीय दृश्य पर्यटकांना मोहित करते. मात्र, अद्याप पाऊस बरसलेला नाही. आतापर्यंत पडलेल्या पावसाने बोडख्या टेकड्या तेवढ्या हिरव्या झाल्याने पर्यटकांना दिलासा मिळाला. मात्र, खळखळ वाहणारे नदी-नाले कोरडे पडले आहेत. चिखलदऱ्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी दुसरा शनिवारृ आणि रविवारची सुटी पाहता पर्यटकांची संख्या गतवर्षीपेक्षा यावर्षी कमालीची वाढली आहे. नगरपालिकेच्या पर्यटन कर नाक्यावरून आकडेवारी स्पष्ट झाली.
मध्यप्रदेश आणि विदर्भातील पर्यटक मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात चिखलदऱ्यात येतात. चिखलदरा नगरपालिकेच्या पर्यटक नोंदीवर नजर टाकली असता गतवर्षीपेक्षा येत्या जून आणि जुलै महिन्यात पर्यटकांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. त्यानुसार जून २०१६ मध्ये ५,१४० प्रौढ पर्यटक आणि २०२ मुले अशा एकूण ५३४२ पर्यटकांनी हजेरी लावली होती. तर जुलै महिन्यात २३,८०० पर्यटकांची नोंद असून पालिकेला २ लक्ष ३७ हजार रुपयांचा पर्यटन महसूल मिळाला होता.
यावर्षी २०१७ जूनमध्ये १७ हजार ७७४ प्रौढ तर २६४ मुल असे १८ हजार ३८ पर्यटकांनी हजेरी लावली. जुलै महिन्यात ९ तारखेपर्यंतच सात हजारांवर पर्यटकांचा आकडा गेला आहे. चिखलदरा नगर पालिकेला या सव्वा महिन्यातच २ लक्ष ३५ हजारांचा महसूल प्राप्त झाला आहे. मात्र, आता पर्यटकांना पावसाची प्रतीक्षा आहे.

पाऊस बेपत्ता, २११ मि.मी.
चेरापुंजीची आठवण करून देत धो-धो कोसळणारा पाऊस आणि त्यात मनसोक्त भिजणारे पर्यटक असे काहीसे चित्र चिखलदरा पर्यटनस्थळावर दरवर्षी पाहायला मिळते. मात्र, यंदा पावसाने चांगलीच दडी मारल्याने पिण्याच्या पाण्यासाठी कधी नव्हे अशी वणवण शहरवासियांना करावी लागत आहे. रविवार ९ जुलैपर्यंत २११ मि.मी. पावसाची नोंद झाली. गतवर्षी २०१६ मध्ये २९८ मि.मी.इतकी नोंद होती तर मागील ११ वर्षातील पावसाच्या नोंदीवर नजर टाकली असता सन २०१३ मध्ये सर्वाधिक २४७३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून सन २००६ मध्ये सर्वात कमी ११७६ मि.मी. पाऊस चिखलदऱ्यात कोसळला आहे.

गतवर्षी हत्तीडोहामध्ये मनसोक्त आंघोळीची मौज केली होती. मात्र, यावर्षी निराशा झाली. पावसाशिवाय चिखलदऱ्यात मजा नाही.
- ध्ीारज ओझा
पर्यटक, बऱ्हाणपूर

चिखलदऱ्यात पावसाने दडी मारली. त्यामुळे येथील धबधबे आटले आहेत. पावसात पर्यटनाचे सौंदर्य खुलून येते. पर्यटकांवरच येथील व्यवसाय अवलंबून आहे.
- राजेंद्रसिंह सोमवंशी, नगराध्यक्ष,

Web Title: Tremendous tourists want to attract visitors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.