‘सीएए’च्या समर्थनार्थ परतवाडा अचलपूरमध्ये तिरंगा रॅली; 25 हजार नागरिक सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 06:14 PM2020-01-07T18:14:25+5:302020-01-07T18:14:58+5:30

‘सबसे उपर राष्ट्रवाद’ची फलके झळकली

Triangular rally in Achalpur, backyard in support of CAA; 25 thousand citizen participants | ‘सीएए’च्या समर्थनार्थ परतवाडा अचलपूरमध्ये तिरंगा रॅली; 25 हजार नागरिक सहभागी

‘सीएए’च्या समर्थनार्थ परतवाडा अचलपूरमध्ये तिरंगा रॅली; 25 हजार नागरिक सहभागी

Next

अमरावती: केंद्राचा सुधारित नागरिकत्व कायदा ‘सीएए’च्या समर्थनार्थ अचलपूर-परतवाडा येथे ७ जानेवारी रोजी रॅली काढण्यात आली. या रॅलीत तीनशे फुटांच्या तिरंग्यासह राष्ट्रवादाचे फलक, शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि भगवा ध्वज उंचावत जवळपास 24 ते 25 हजार लोकं सहभागी झाले होते.

परतवाड्यातील नेहरू मैदानावरून तर अचलपूर येथील गांधीपूल परिसरातून निघालेली ही लक्षवेधक रॅली एसडीओंच्या कार्यालयावर पोहचली. तेथे गजानन कोल्हे यांच्या नेतृत्वात एसडीओ संदीपकुमार अपार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे असलेले निवेदन सोपविण्यात आले. सीएए समर्थनार्थ निघालेल्या रॅलीवर परतवाड्यात पुष्पवर्षाव करण्यात आला. रॅली समर्थनार्थ व्यापाºयांनी आपली प्रतिष्ठाने दुपारी 1.30 वाजेपर्यंत बंद ठेवलीत. रॅलीत ‘भारत माता की जय ,वंदे मातरम ,इंडिया वाँट्स सीएए’च्या घोषणा दिल्या गेल्यात. 

रॅलीमध्ये गजानन कोल्हे, प्रमोद डेरे, पन्नालाल अग्रवाल, राजेंद्र चांडक, सुशीर श्रीवास्तव, माणिक देशपांडे, नरेंद्र फिसके, ओमप्रकाश दीक्षित, अनिल तायडे, सूर्यकांत जयस्वाल, शशिकांत जयस्वाल, नीलेश सातपुते, अभय माथने, ललिता ठाकूर, नीलेश तारे, राजकुमार बरडीया, राजू लोहीया, खानझोडे, अभय मेघवाणी, पप्पू कालोया, अ‍ॅड.लोझरे, रुपेश लहाने, अक्षय लहानेंसह भारतीय जनतापक्ष, शिवसेना, चेम्बर आॅफ कॉमर्स, जय श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळ, नवरंग मंडळ, विश्वहिंदू परिषद, बजरंगदल, हनुमान व्यायाम मंडळ, अचलपूर युवा संघर्ष समिती, शिव गणेश मंडळ, भाजपा युवा मोर्चा आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते. रॅली दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त होता. दंगानियंत्रण पथकासह शस्त्रधारी पोलीसही शहरात तैनात होते. अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक श्याम घुगे, एसडीओपी पी.जे.अब्दागिरे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक सदानंद मानकर, सेवानंद वानखडे, पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवली. रॅलीत मोठ्या प्रमाणात महिलाही सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Triangular rally in Achalpur, backyard in support of CAA; 25 thousand citizen participants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.