आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहे ‘लॉकडाऊन’च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:13 AM2021-04-09T04:13:38+5:302021-04-09T04:13:38+5:30
अमरावती : आदिवासी विकास विभाग अधिनस्थ आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, एकलव्य निवासी शाळा, अनुदानित आश्रमश्रशाळा, शासकीय वसतिगृह आणि नामांकित शाळा ...
अमरावती : आदिवासी विकास विभाग अधिनस्थ आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, एकलव्य निवासी शाळा, अनुदानित आश्रमश्रशाळा, शासकीय वसतिगृह आणि नामांकित शाळा लॉकडाऊन आहे. शैक्षणिक सत्र लॉकडाऊनमुळे गेले. ऑनलाईन शिक्षण झाले पण, आदिवासी विद्यार्थ्यांना ते पचनी पडले नाही. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षेत कसाेटी ठरणार आहे.
फ्रेबुवारी २०२१ मध्ये ईयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोरोनाचा उद्रेक वाढताच शाळा सुरू झाल्याच नाही. ईयत्ता नववी ते बारावीपर्यंत २३ नोव्हेंबर २०२० पासून वर्ग सुरु झाले होते. मात्र, आदिवासी पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यासाठी फारसा उत्साह दाखविला नाही. त्यामुळे आश्रमशाळा सुरु होऊनही नववी ते बारावी वर्गात अत्यल्प गर्दी होती. अमरावती जिलह्यात आश्रमशाळा सुरु झाल्यात, मात्र विद्यार्थीच नाही, असे चित्र होते. परंतु, राज्यात पुन्हा कोरोना वाढीस लागला आणि ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. याचा फटका आश्रमशाळा, वसतिगृहांना बसला आहे.
-----------------
अमरावती एटीसी अंतर्गत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा
प्रकल्प शासकीय आश्रमशाळा अनुदानित आश्रमशाळा
धारणी- २० २६
पांढरकवडा- १८ २८
किनवट- १६ २१
अकोला - ०८ १९
औरंगाबाद- ०८ ०६
पुसद- ०७ १२
कळमनुरी- ०५ ०९
----------------------------------
कोट
शासन निर्देशानुसार कोरोना नियमावलींचे पालन करून शाळा सुरु करण्यात येणार आहे. यात निवासी शाळा, आश्रमशाळा, एकलव्य स्कूल, इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांचा समावेश असणार आहे. नवीन गाईडलाईनची प्रतीक्षा आहे.
- विनोद पाटील, अपर आयुक्त, अमरावती