आदिवासी बांधवांची जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 01:23 AM2018-07-06T01:23:37+5:302018-07-06T01:24:52+5:30

अनुसूचित जमाती व वन निवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम व वनमित्र मोहिमेंतर्गत मेळघाटातील वनहक्क धारकांची बाजू जाणून त्यांच्या मागण्यांची पूर्तता करावी, या मागणीसाठी गुरूवारी माजी आमदार पटल्या गुरूजी यांच्या नेतृत्वात जिल्हाकचेरीवर आदिवासी बांधवानी धडक दिली.

Tribal brothers attacked District Collector | आदिवासी बांधवांची जिल्हा कचेरीवर धडक

आदिवासी बांधवांची जिल्हा कचेरीवर धडक

Next
ठळक मुद्देनिवेदन : वनहक्क निकाली काढा

अमरावती : अनुसूचित जमाती व वन निवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम व वनमित्र मोहिमेंतर्गत मेळघाटातील वनहक्क धारकांची बाजू जाणून त्यांच्या मागण्यांची पूर्तता करावी, या मागणीसाठी गुरूवारी माजी आमदार पटल्या गुरूजी यांच्या नेतृत्वात जिल्हाकचेरीवर आदिवासी बांधवानी धडक दिली.
वनहक्क कायद्यानुसार मेळघाटात ठोस अंमलबजावणी न केल्याने अनेक वन हक्कधारक त्यांच्या शेतीपासून वंचित होत आहेत. त्यांचेकडे शेतीशिवाय उदरनिर्वाहासाठी दुसरा पर्याय नाही. रोजगार हमी योजनेत रोजगार मिळत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. अशातच खरीप हंगातील शेती निसर्गावर अवलंबून आहे.त्याचे वनहक्काचे दावे पात्रतेत बसतात. यासोबतच वनविभागाव्दारा त्यांच्या शेतात खड्डे खोदून नोटीसद्वारे कारवाई सुरू आहे. त्यामुळे मेळघाटात वनमित्र मोहिमेची ठोस अंमलबजावणी करावी, सन २००२ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र पुरावा म्हणून मान्यता द्यावी, आदी मागण्या निवेदनातून केल्या आहे. यावेळी म्हातींग साखरे, पटल्या गुरूजी, बंड्या साने, रंजित घोडेस्वार, बी.एस.साने, जोस कलेली, ब्रिजलाल गाडगे, श्रीचंद जांबेकर, श्याम कास्देकर, नंदू दहिकर, रा.बु. राजेकर, ललिता बेठेकर उपस्थित होते.

Web Title: Tribal brothers attacked District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा