‘आधार’द्वारा मेळघाटातील आदिवासी बांधवांना मायेची पाखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 09:43 PM2018-10-02T21:43:37+5:302018-10-02T21:44:33+5:30

आपण सुखी आहोत काय, याऐवजी आपण किती जणांना सुखी करू शकतो व हाच खरा जीवनाचा आनंद आहे. याच कार्याने झपाटलेल्या धेयवेड्या युवकांनी मेळघाटातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या वस्त्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शहरातील नागरिकांना मदतीची हाक दिली.

Tribal brothers in Melghat by 'Aadhaar' | ‘आधार’द्वारा मेळघाटातील आदिवासी बांधवांना मायेची पाखर

‘आधार’द्वारा मेळघाटातील आदिवासी बांधवांना मायेची पाखर

Next
ठळक मुद्देसमाजॠणाची ऊतराई : नागरिकांच्या दातृत्वातून एक लाख २० लाखांवर वस्त्रांचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आपण सुखी आहोत काय, याऐवजी आपण किती जणांना सुखी करू शकतो व हाच खरा जीवनाचा आनंद आहे. याच कार्याने झपाटलेल्या धेयवेड्या युवकांनी मेळघाटातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या वस्त्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शहरातील नागरिकांना मदतीची हाक दिली. तीन वर्षांत तब्बल २६ वेळा मेळघाटातील अतीदुर्गम गावांमध्ये स्वखर्चाने जाऊन एक लाख २० हजारांवर वस्त्रांसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. समाजॠणाची ऊतराई करण्याचा आगळावेगळा संकल्प ‘आधार फाऊंडेशन’द्वारा करण्यात आला आहे.
मेळघाटात पाच वर्षांपूर्वी लोकसभेच्या प्रचाराला गेलो असताना तेथील वस्तुस्थिती अनुभवास आली अन् त्याचक्षणी आदिवासी बांधवांच्या मदतीसाठी संकल्प केल्याचे प्रदीप बाजड यांनी सांगितले. याला दिलीप हटवार, अनिल ढवळे, महेंद्र शेंडे, रामेश्वर वसू, अनंत बाजड, राजेश डिगवार, संजय राऊत, दीपक भेलकर, अरविंद विंचुरकर, चित्रा ढवळे, सविता बाजड आदींची साथ मिळाल्यानेच पाहता पाहताकपडे हा उपक्रम एक सामाजिक चळवळ बनल्याचे बाजड म्हणाले.
यासाठी शहरात कलेक्शन सेंटर आहेत. ७० ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांना वस्त्रदानाचे आवाहन केले असता, दर महिन्यांत पाच ते सात हजार कपडे या सेंटरवर जमा होतात. या कपड्यांचे ग्रेडींग करून व त्याचे गठ्ठे बांधून दर महिन्याला स्वखर्चाने मित्रांसोबत तर कधी परिवारासोबत जावून तेथे कपडे वाटण्यात येत आहे. यावेळी आदिवासी बांधवांच्या चेहरावरचा आनंद पाहून आपण जे काही करत आहे. त्या सामाजिक कार्याची पोचपावती त्याचक्षणाला मिळते. २ आॅक्टोबर २०१५ सुरूवात केलेल्या उपक्रम नागरिकांच्या दातृत्वामुळेच फलद्रुप होत असल्याचे बाजड यांनी आवर्जून सांगितले. समाजात वावरत असताना कळत नकळत समाजघटकांचे ॠ ण आपल्यावर होते, त्या समाजॠणाची ऊतराई करण्याचा संकल्प असल्याचे ते म्हणाले.
आपादग्रस्थांनाही मदतीचा हात
केवळ मेळघाटातच नव्हे, तर अमरावती शहरात उत्तमनगरातील घराला लागलेल्या आगीत खोब्रागडे कुटुंब निराधार झाले. त्या परिवाराला हातगाडी, शिलाई मशीन, धान्य, तेलाचा डबा, व तीन हजारांची मदत याशिवाय मेळघाटात सेमनाडोह परिसरात लागलेल्या आगीत बाधित झालेल्या ढाना, भवाई येथील परिवारांना वस्त्रांसोबत जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. आपल्याला ज्या वस्तूंचे काम नाही, त्या जर या केंद्रावर जमा केल्या तर यामधून अनेकांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात, हे आधार फाऊंडेशनने दाखवून दिले आहे.
२६ वेळा ११० गावांमध्ये वस्त्रांचे वाटप
सहकाऱ्यांच्या मदतीने तीन वर्षांत मेळघाटातील तब्बल ११० गावांमध्ये लहानथोरांना वस्त्रांचे वाटप केलेले आहे. पहिल्यांदा २५ आक्टोबर २०१५ला ढाकना, डोिलार, सावऱ्या, मालूर. भांडुप येथे वस्त्रांचे वाटप केल्यानंतर माखला, बिच्छुखेडा, चुनखडी, आवागड, बोराटाखेडा, रेटाखेडा, भूत्रूम, रूईपठार, चिलाटी, हतरू, चेथर, केळदाबोद, चकवाभोळ, भोंडीलावा, रंगुबेली, काटकोह, काटा, कोठा, जांबू, नांदोरी, सोसाखेडा, चौराकुंड, चोपन, भुलोरी, लवादा, मांजरी, बानूर, धोतराढोणा, बिबा, हारू, खारी, हिडला, भवाई, बेला, जांबळी, लोणझरी, मांजरा, बिहाली, निमकुंड, कोहाना, धोतारखेडा, भांदरी, जामूननाला, बोरी, कागपूर, टेटू, अमझरीम खडकाली, आडनदी, पिली, रोरा, भवई, भूलोरी, कोकरू, देढपानी, अंबापाटी, माखला, चुनखडी आदी गावांना वस्त्रांचे वाटप करण्यात आले.

Web Title: Tribal brothers in Melghat by 'Aadhaar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.