आदिवासी विकास विभागात बदल्यांची धूम, सोयीच्या ठिकाणासाठी कर्मचाऱ्यांची फिल्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 05:24 PM2018-05-22T17:24:03+5:302018-05-22T17:24:03+5:30

आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत सात प्रकल्प कार्यालय स्तरावर शासकीय सेवकांच्या नियतकालीन बदल्यांची धूम सुरू झाली आहे.

Tribal Development Department Transfer News | आदिवासी विकास विभागात बदल्यांची धूम, सोयीच्या ठिकाणासाठी कर्मचाऱ्यांची फिल्डिंग

आदिवासी विकास विभागात बदल्यांची धूम, सोयीच्या ठिकाणासाठी कर्मचाऱ्यांची फिल्डिंग

Next

-  गणेश वासनिक 

अमरावती - आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत सात प्रकल्प कार्यालय स्तरावर शासकीय सेवकांच्या नियतकालीन बदल्यांची धूम सुरू झाली आहे. तीन वर्षे सेवेचा कार्यकाळ पूर्ण करणाºया बदलीपात्र कर्मचा-यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, बदलीदरम्यान सोयीचे ठिकाण मिळावे, यासाठी अनेकांनी आपली ‘वर्णी’ लागावी, यासाठी प्रयत्न चालविल्याचे चित्र आहे.
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने समुपदेशानाद्वारे बदलीबाबतचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्तांनी कर्मचा-यांच्या नियतकालीन बदल्यासंदर्भात तयारी चालविली आहे. अकोला, धारणी, किनवट, पांढरकवडा, औरंगाबाद, पुसद व कळमनुरी या सात प्रकल्प कार्यालय स्तरावर कार्यरत विविध संवर्गातील बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार समुपदेशनाद्वारे कर्मचाºयांची बदली अपेक्षित आहे. मात्र, काही बदली पात्र कर्मचाºयांनी महत्त्वाच्या ठिकाणी बदलीसाठी जोरदार फिल्डिंग लावत असल्याचे वास्तव आहे. कर्तव्य बजावताना सोयीचे ठिकाण मिळावे, यासाठी बदलीपात्र कर्मचारी अपर आयुक्तांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनासमोर गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. विशेषत: पांढरकवडा, कळमनुरी व धारणी प्रकल्पातील बदलीपात्र काही कर्मचाºयांनी थेट मंत्रालयातून दबावतंत्र आणल्याची माहिती आहे. कुटुंबीयापासून दूर न होता मुख्य रस्त्यालगतच्या आश्रमशाळा, वसतिगृहात बदलीसाठी अनेकांनी वाटेल ते किंमत मोजण्याची तयारी चालविल्याचे बोलले जात आहे. ३० टक्के बदलीचे प्रमाण लागू करण्यात आल्यानुसार अमरावती ‘ट्रायबल’मध्ये १७ संवर्गात ३०७ बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार करण्यात आली आहे.

अशा होणार संवर्गानुसार बदल्या
आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत  पदवीधर प्राथमिक शिक्षक १४, माध्यमिक शिक्षक २०, अधीक्षक पुरूष २६, अधीक्षक महिला २४, उच्च माध्यमिक शिक्षक ४८, कनिष्ठ लिपिक ७१, वरिष्ठ लिपिक १४, उपलेखापाल ७, निरीक्षक २, कार्यालय अधीक्षक ३, माध्यमिक मुख्याध्यापक १८, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीे १६, गृहपाल पुरूष १९, गृहपाल महिला १४, ग्रंथपाल ४, प्रयोगशाळा सहायक ५ तर लघुतंत्र लेखक २ असे संवर्गानुसार कर्मचा-यांच्या बदल्या होणार आहेत.

आर्थिक व्यवहारावर ‘एसीबी’ची नजर?
आदिवासी विकास विभागात अपहार, भ्रष्टाचार होत असल्याचे यापूर्वी एसीबीने धाडसत्र राबवून कारवाईद्वारे स्पष्ट केले. त्यामुळे कर्मचा-यांच्या बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होणार असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकूणच प्रक्रियेवर सूक्ष्म नजर ठेवली आहे. कर्मचा-यांना सोयीच्या ठिकाणी बदली करून देण्यासाठी काही दलालदेखील सक्रिय झाल्याची माहिती आहे. त्याअनुषंगाने एसीबीच्या रडारवर ‘ट्रायबल’चे काही अधिकारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

Web Title: Tribal Development Department Transfer News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.