मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्याने सोयाबीनचे पीक नांगरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:10 AM2021-07-01T04:10:50+5:302021-07-01T04:10:50+5:30
झझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझ केसाळ अळीचा ७०० हेक्टरवर हल्ला, बळीराजाला मदतीची अपेक्षा मेळघाटात हतबल आदिवासी शेतकऱ्याने पेरलेले शेत नांगरले लोकमत विशेष नरेंद्र ...
झझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझ
केसाळ अळीचा ७०० हेक्टरवर हल्ला, बळीराजाला मदतीची अपेक्षा
मेळघाटात हतबल आदिवासी शेतकऱ्याने पेरलेले शेत नांगरले
लोकमत विशेष
नरेंद्र जावरे - परतवाडा
पंधरा दिवसांपूर्वी पेरणी केलेले सोयाबीन पीक केसाळ अळ्यांनी रात्रीतून फस्त केले. हवालदिल आदिवासी शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेल्यामुळे पेरलेल्या पिकावर नांगरणी करायला सुरुवात केल्याचे धक्कादायक चित्र आहे. टेम्ब्रुसोंडा परिसरातील ७०० हेक्टरपेक्षा अधिक जमिनीवरील पिकांना केसाळ अळीची बाधा पोहोचली आहे. गोरगरीब आदिवासींनी शासनाकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे.
चिखलदरा तालुक्यातील टेम्ब्रुसोंडा परिसरातील बहादरपूर, धरमडोह, आकी, मोरगड आदी गावांमध्ये सोयाबीन पिकांवर मोठ्या प्रमाणात केसाळ अळ्यांनी हल्ला केला. उगलेले सोयाबीन पीक त्यांनी फक्त करून टाकले. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांवर नवीन संकट घोंगावत आहे. पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्यांची जुळवाजुळव त्यांनी मग्रारोहयोच्या कामावर जाऊन केली. खडकाळ, मुरमाड जमिनीवर सोने उगवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न केसाळ अळ्यांनी उधळून लावला आहे. कृषी विभागाच्यावतीने उपाययोजनांसाठी शास्त्रज्ञ बोलावण्यात आले असले तरी हातचे पीक गेले आहे. ज्वारी व इतर पिकांचे बियाणे उपलब्ध करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.
बॉक्स
ज्वारी, मका पेरण्याची तयारी
बहादरपूर येथील श्यामराव दहीकर व साहेबराव दहीकर या शेतकऱ्यांसह इतरही काहींनी मंगळवारी शेत नांगरून टाकले व पेरलेले सोयाबीनचे पीक नष्ट केले. आता मका व ज्वारीसाठी शेत तयार करण्याच्या कामाला लागले आहेत. किमान ७०० पेक्षा अधिक हेक्टरवर नुकसानाचा प्राथमिक अंदाज तालुका कृषी अधिकारी विजय पाठोळे यांनी वर्तविला.
बॉक्स
चिखलदरा तालुक्यात एकूण २३ हजार ३५५ हेक्टर शेतजमीन आहे पैकी आदिवासी अशा पद्धतीने पिके घेतात
पीक सरासरी पेरणी आतापर्यंत पेरणी
सोयाबीन १० हजार हेक्टर ५००० हेक्टर
ज्वारी ४६३३ हेक्टर १५९० हेक्टर
तूर २३२० हेक्टर १६५०हेक्टर
कपाशी १२६७ हेक्टर ९१० हेक्टर
भात १२९७ हेक्टर ५७० हेक्टर
इतर १३० हेक्टर ७० हेक्टर
(बाजरी, मिरची, तीळ, मूग)
कोट
दोन हेक्टरवर सोयाबीन पेरले. केसाळ अळ्यांनी फस्त केले. पर्याय नसल्याने पूर्ण शेत नांगरून टाकले. आता ज्वारी पेरणीची तयारी करीत आहे.
- श्यामराव दहीकर, शेतकरी, बहादरपूर
कोट
गुरुवारी परिसरात कृषितज्ज्ञांना नेऊन आदिवासी शेतकऱ्यांना कुठली फवारणी करायची, यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.
- विजय पाठोळे, तालुका कृषी अधिकारी, चिखलदारा
===Photopath===
300621\screenshot_2021-06-30-15-47-11.png
===Caption===
सोयाबीन जे शेत नांगरतांना शेतकरी