आदिवासींची जमीन ‘तापी’त जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 10:58 PM2019-02-02T22:58:08+5:302019-02-02T22:58:22+5:30

आदिवासींची शेतजमीन तापी प्रकल्पात जाऊ देणार नाही. आदिवासी बांधवांना भूमिहीन होऊ देणार नाही, केलपाणी व धारगड या गावांसह आठ गावांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने तीन हजार आदिवाशींना वाऱ्यावर सोडले. अशा बेजबाबदार प्रशासनाला वठणीवर आणू, मेळघाटच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही नवनीत राणा यांनी धारणी येथील भरगच्च महिला मेळाव्यात दिली.

Tribal land will not be used in 'Tapi' | आदिवासींची जमीन ‘तापी’त जाणार नाही

आदिवासींची जमीन ‘तापी’त जाणार नाही

Next
ठळक मुद्देनवनीत राणा : धारणीच्या महिला मेळाव्यात ग्वाही

अमरावती : आदिवासींची शेतजमीन तापी प्रकल्पात जाऊ देणार नाही. आदिवासी बांधवांना भूमिहीन होऊ देणार नाही, केलपाणी व धारगड या गावांसह आठ गावांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने तीन हजार आदिवाशींना वाऱ्यावर सोडले. अशा बेजबाबदार प्रशासनाला वठणीवर आणू, मेळघाटच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही नवनीत राणा यांनी धारणी येथील भरगच्च महिला मेळाव्यात दिली.
आदिवासी महिलांच्या समस्या जाणून घेता याव्यात, यासाठी धारणी येथे शनिवारी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवनित राणा बोलत होत्या.आजही मेळघाटातील प्रत्येक गाव, खेड्यात आदिवासी बांधवांना घरकुल नाही. विद्यृत नाही, रस्ते नाहीत. आधिवासी युवक बेरोजगार आहेत. त्यांच्या हाताला काम मिळावे, यासाठी कोणी प्रयत्न केले नाहीत. आम्ही मात्र, यासर्व समस्या सोडविणार आहो. यापुढे रोजगारासाठी कोणत्याही आदिवाशी बांधवाला गाव सोडून जाण्याची वेळ येणार नाही. वनविभागाच्या त्रासापासून आधिवाशी बांधवांना मुक्त करू, कुपोषणाच्या नावावर आदिवासींची लूट होऊ देणार नाही, असे नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी मेळघाट संपर्कप्रमुख उपेन बिछले, धारणी शहराध्यक्षा वर्षा जयस्वाल, जितू दुधाणे, रीता मालविय, जानेबाई, शोभा पवार, सुनंदा जोशी, विमल सेंगर, सुगडी हिरालाल, बुराई बेठेकर, शोभा हांडे, सुकई ठाकरे, सिमा मेटकर, शीला मालविय, शारदा गिरी, आदी उपस्थित होते.

Web Title: Tribal land will not be used in 'Tapi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.