आदिवासी गोवारी बांधवांची जिल्हा कचेरीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 10:10 PM2018-10-19T22:10:12+5:302018-10-19T22:10:32+5:30
गोवारी जमात ही आदिवासी आहे. गोंडगोवारी ही जातच अस्तित्वात नसल्याचा निर्वा$ळा उच्च न्यायालयाने देऊन तब्बल दोन महिन्यांचा कालावधी गेला. राज्य शासनाने या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याने शुक्रवारी जिल्ह्यातील दहा हजार आदिवासी गोवारी बांधवांनी जिल्हा कचेरीवर धडक मूक मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर सत्याग्रह आंदोलन केले. यादरम्यान सायन्स कोअर मैदानावरून निघालेल्या मूक मोर्चात तीन किलोमीटरपर्यंत रांग होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गोवारी जमात ही आदिवासी आहे. गोंडगोवारी ही जातच अस्तित्वात नसल्याचा निर्वा$ळा उच्च न्यायालयाने देऊन तब्बल दोन महिन्यांचा कालावधी गेला. राज्य शासनाने या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याने शुक्रवारी जिल्ह्यातील दहा हजार आदिवासी गोवारी बांधवांनी जिल्हा कचेरीवर धडक मूक मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर सत्याग्रह आंदोलन केले. यादरम्यान सायन्स कोअर मैदानावरून निघालेल्या मूक मोर्चात तीन किलोमीटरपर्यंत रांग होती.
राज्यातील आदिवासी गोवारी समाज हक्काचा लढा अनेक वर्षापासून लढत आहे. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी ११४ गोवारींचे बळी जाऊनही शासनाने गोवारी समाजाचा प्रश्न सोडविला नाही. त्या अनुषंगाने हायकोर्टात प्रकरणसुद्धा दाखल केले होते. अखेर १४ आॅगस्ट २०१८ रोजी गोवारी हे आदिवासीच असल्याबाबतचा निर्णय हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला. या निर्णयानंतर गोवारी समाजाला बऱ्याच वर्षांचा संघषार्नंतर न्याय मिळाला आता न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी राज्य शासनाने करावी, या मागणीसाठी आदिवासी गोवारी समन्वय समितीच्यावतीने राज्यभर सत्याग्रह आंदोलनांचा दुसरा टप्पा पार पडला. इर्विन चौकात डॉ. बाबासाहेब आबेडकर व राणी दुर्गावती यांच्या पुतळ्याला मोहन राऊत, पुंडलिक चामलोट, मारोतराव वाघाडे, भाऊराव चौधरी यांनी हारार्पण केले. त्यानंतर हा मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला. यावेळी आदिवासी गोवारी समन्वय समितीचे देविदास बासकवरे, सुदर्शन चामलोट, रामभाऊ शेंदरे, मंगेश ठाकरे, उत्तमराव ठाकरे, रावसाहेब नेवारे, संजय नेवारे, रामभाऊ शेंदरे, मनोहर अरतपायरे, नंदू सहारे, कृष्णा चौधरी, मंगेश ठाकरे, उत्तमराव ठाकरे, रावसाहेब नेवारे , रामकृष्ण भाले, मंगेश चौधरी, बंडू राऊत, शंकर नेवारे, मंगेश राऊत, रघुनाथ नेवारे, किशोर सहारे, नंदू शहरे, विनायक नेहारे, दीपक नेवारे, शंकर सहारे, पंकज नेहारे, मोहन सहारे, गणेश नेवारे, शिवाजी बरडे, प्रकाश शेंदरे, प्रशांत सोनवने आदी उपस्थित होते.