धारणीत पाण्यासाठी आदिवासींची पायपीट

By admin | Published: February 14, 2016 12:17 AM2016-02-14T00:17:14+5:302016-02-14T00:17:14+5:30

उन्हाळ्याची सुरुवात खऱ्या अर्थाने मार्चमध्ये होळी पेटल्यानंतर होते. मात्र यंदा फेब्रुवारीच्या पंधरवड्यातच उन्हाळा सुरू झाला आहे.

Tribal walk | धारणीत पाण्यासाठी आदिवासींची पायपीट

धारणीत पाण्यासाठी आदिवासींची पायपीट

Next

योजनेला पांढरा हत्ती : फटका भारनियमनाचा
धारणी : उन्हाळ्याची सुरुवात खऱ्या अर्थाने मार्चमध्ये होळी पेटल्यानंतर होते. मात्र यंदा फेब्रुवारीच्या पंधरवड्यातच उन्हाळा सुरू झाला आहे. गेल्यावर्षी कमी पाऊ स झाल्याने पाण्याची पातळी खाली गेली आहे. अशातच गावखेड्यात १८ ते २० तासांपर्यंत भारनियमन होत असल्याने त्याचा फटका पाणीपुरवठा योजनेलाही बसत आहे.
गावात मोठी पाण्याची टाकी आहे. मात्र सदोष पाणीपुरवठा योजनेमुळे एक ते दोन किलोमीटर अंतरावरून विहिरीतून टाक्यापर्यंत पाणी येणे कठीण झाले आहे.
मेळघाटातील प्रत्येक गावालगतच्या शेतातील विहिरीत भरपूर पाणीसाठा असताना ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व भूजल सर्वेक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. पहिले पाण्याजवळ विहीर खोदल्याने हमखास पाणी लागते व खोलीकरण जास्त न करता देयके काढता येते. दुसरा फायदा दगड व रेती या पात्रातून चोरून कामे चालविले जाते. तिसरा फायदा २ कि.मी. पाईपलाईनचे खड्डे व पाईपच्या अंदाजपत्रकात वाढ करता येतो. मात्र सर्वांचा फटका ज्या गावात नळयोजना आहे, त्या गावकऱ्यांना बसत आहे.
इतक्या लांब अंतरावरून विहिरीतून पाणी टाक्यापर्यंत येत नसल्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. याचे उदाहरण तालुक्यातील मांडवा, बासपानी, खापरखेडा, झिलपी, पोहरा, निरगुडी, धारणमहू, पाटीया, चटवाबोड, वैरागड, कुटंगा, रोहणीखेडा, बिजुधावडी, खारी यासह अनेक गावांत पहावयास मिळत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Tribal walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.