मेमना येथील आदिवासींची जिल्हाकचेरीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:23 AM2020-12-03T04:23:51+5:302020-12-03T04:23:51+5:30
फोटो मेलवर दखने नावाने आहे अमरावती : चिखलदरा तालुक्यातील मेमना येथील पुनर्वसित कुटुंबाच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात या प्रमुख ...
फोटो मेलवर दखने नावाने आहे
अमरावती : चिखलदरा तालुक्यातील मेमना येथील पुनर्वसित कुटुंबाच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी २ डिसेंबर रोजी अन्यायग्रस्त आदिवासी बांधवांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले.
पुनर्वसित आदिवासी बांधवांच्या प्रमुख मागण्यांमध्ये मेमना गावात पिण्याच्या पाण्यासाठी नळ योजना सुरू करावी, गावात दिवाबत्तीची व्यवस्था करावी, गावांतील रस्ते बांधण्यात यावे, सांडपाणी व्यवस्थापनाकरिता नालीचे बांधकाम करावे, आदिवासी कुटूंबाकरिता घरकुल योजना राबवावी, कुटुंबांना खावटी कर्ज योजना सुरू करावी, गावात अंगणवाडी व शाळा सुरू करण्यात यावी, आरोग्य सेवा सुरू कराव्यात आदी मागण्यांचा समावेश आहे. मागण्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी झेडपीचे समाज कल्याण सभापती दयाराम काळे, सदस्य महेंद्र गैलवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिश्रीलाल झारखंडे, अमोल बोरकर, सुनील तायडे, संजू बेलकर, बाबुलाल जावरकर, राजू काळे, लालमन जावरकर, सुमन काळे, वंदना जावरकर, रिचमू कास्देकर, चंदा कास्देकर आदींनी केली आहे.