‘एक दिया शहिदों के नाम’ कार्यक्रमातून शहिदांना श्रद्धांजली
By admin | Published: November 11, 2016 12:33 AM2016-11-11T00:33:30+5:302016-11-11T00:33:30+5:30
येथील लाईफलाईन इंन्स्टिटयुट आॅफ ह्युमन एक्सिलन्सच्या वतीने एक दिया शहिदों के नाम हा कार्यक्रम
सुरक्षा कवच : चिमुकलीने पेटविला दिवा
अमरावती : येथील लाईफलाईन इंन्स्टिटयुट आॅफ ह्युमन एक्सिलन्सच्या वतीने एक दिया शहिदों के नाम हा कार्यक्रम आयोजित करून त्यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी कनिष्ठ पोलीस अधिकारी सतीश महल्ले होते. स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रीत खत्री या चिमुकलीने दिवा पेटवून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी २०० दिवे पेटवविण्यात आलेत. शहिदांचे स्मरण करण्यात आले. यावेळी इंन्सिटट्युटचे संचालक नीलेश मुरुमकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. देशाच्या सीमेवरती आपल्या प्राणाची तमा न बाळगता देशहितासाठी लढणारा सैनिक आपले खऱ्या अर्थाने सुरक्षा कवच आहे. आपण चांगले जीवन जगू शकतो हे त्यांच्यामुळे, असे प्रतिपादन नीलेश मुरुमकर यांनी केले. यावेळी पोलीस अधिकारी सतीश महल्ले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी गायत्री मानतकर, आकांक्षा मालवीय प्राजक्ता ठाकरे, वैभव जोशी अविनाश काळकेकर यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)