अचलपूर नगरपालिकेत कॉम्प्युटरवर तिरंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:13 AM2021-09-03T04:13:24+5:302021-09-03T04:13:24+5:30
फोटो - ०२ पी तिरंगा परतवाडा : अचलपूर नगरपालिकेत कम्प्यूटर टेबलवर राष्ट्रीय ध्वज अंथरलेला बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ...
फोटो - ०२ पी तिरंगा
परतवाडा : अचलपूर नगरपालिकेत कम्प्यूटर टेबलवर राष्ट्रीय ध्वज अंथरलेला बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. काहींनी यांचे फोटो काढले, तर काहींनी व्हिडिओ शूटिंग केले. नगरपालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेपर्यंत ही बाब पोहोचताच त्यांनी लागलीच हा ध्वज इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलविला.
अचलपूर नगरपालिकेच्या परतवाडा स्थिती मुख्य प्रशासकीय इमारतीवर हा राष्ट्रीय ध्वज बाराही महिने दररोज सूर्योदयाला चढविला जातो, तर सूर्यास्ताला तो उतरविला जातो. अनेक वर्षांपासून ही परंपरा आहे. याकरिता एका कर्मचाऱ्याची खास नियुक्तीही आहे. सूर्यास्ताला ध्वज उतरविल्यानंतर तो घडी करून सुरक्षित ठिकाणी कपाटात ठेवला जातो. यादरम्यान राष्ट्रीय ध्वजाचा कुठलाही अवमान होणार नाही, याची दक्षता संबंधित कर्मचारी प्रामाणिकपणे घेतो. त्याची ती जबाबदारी असून तो राष्ट्रध्वज जमिनीला लागू देत नाही.
दरम्यान, १ सप्टेंबरला आलेल्या पावसात हा ध्वज पूर्णपणे भिजला होता. सूर्यास्तादरम्यान ध्वज उतरविल्यानंतर भिजलेला हा ध्वज कपाटात ठेवणे शक्य नव्हते. म्हणून संबंधित कर्मचाऱ्याने तो ओला राष्ट्रध्वज जमिनीला टेकू न देता टेबलवर वाळू घातला. दरम्यान टेबलवर असलेल्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर ही तो लांबविल्या गेला. यात ती स्क्रीन झाकल्या गेली एवढेच. नेमका हा प्रकार, ही बाब तेथून जाणाऱ्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी त्याचे फोटो व व्हिडीओ काढलेत.
** कोट:--
बुधवारच्या पावसात इमारतीवरील राष्ट्रध्वज भिजला. हा पावसात भिजलेला ओला राष्ट्रध्वज कपाटात ठेवणे शक्य नसल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याने तो टेबलवर वाळू घातला. राष्ट्रध्वजाचा भाग जमिनीला टेकू नये म्हणून त्याने तो त्या टेबलवरील कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर ओढला.
अमोल दहिकर, कार्यालयीन अधीक्षक, नगर परिषद, अचलपूर.
** कोट:-
१९६६ पूर्वीपासून या नगर परिषदेच्या मुख्य इमारतीवर वर्षातील सर्व दिवस राष्ट्रध्वज फडकविला जात आहे. संबंधित नियुक्त कर्मचारी ध्वजसंहितेचे पालन करत आपली जबाबदारी पार पाडतो. राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही, याची तो खबरदारी घेतो. पावसात भिजलेला ध्वज वाळू घालणे हे त्या नियुक्त कर्मचाऱ्याचे काम आहे. यादरम्यान राष्ट्रध्वज जमिनीला लागू नये, याची खबरदारी त्या कर्मचाऱ्याने घ्यायला हवी.
राजाभाऊ देशमुख, सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी, नगर परिषद, अचलपूर
दिनांक02/09/21. फोटो