त्रेता युगाच्या महानायकाचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 05:00 AM2020-08-06T05:00:00+5:302020-08-06T05:01:14+5:30
मोझरी येथील पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानातील राममंदिरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीरामाचे पूजन करून राममंदिर पायाभरणीबाबत जल्लोष केला. अयोध्या येथील राम मंदिराच्या पायाभरणीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतील माती व विठ्ठल रुक्मिणीचे माहेरघर असलेल्या कौंडण्यपूर येथील वशिष्ठा नदीचे जल नेण्यात आले. त्यामुळे तिवसा तालुक्याचे या रामपर्वाशी ऋणानुबंध जुळले आहेत.
अमरावती: अयोध्या येथे राम मंदिर भूमिपूजन सोहळा पार पडताच भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा, शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजापेठ येथील भाजप कार्यालयात एकत्र येवून जल्लोष केला. कार्यालयात दिवे लावून रोषणाई करण्यात आली. यावेळी बुंदी लाडूचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा शहरध्यक्ष किरण पातुरकर यांच्या हस्ते प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेची पूजा करुन लाडुचा प्रसाद वाटप केला. यावेळी महामंत्री गजानन देशमुख, महापौर चेतन गावंडे, रवींद्र खांडेकर, शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय, जयंत डेहनकर, उपमहापौर कुसुम साहु, स्थायी समिती सभापती राधा कुरील, पक्षनेता सुनील काळे, सुरेखा लुंगारे, रिता मोकलकर, अजय सारस्कर, प्रणीत सोनी, बलदेव बजाज, लता देशमुख, मंगेश खोंडे, दीपक खताळे, आत्माराम पुरसवाणी, शिल्पा पाचघरे आदी उपस्थित होते.
विहिंपच्यावतीने ५१ कारसेवकांचे पूजन
विश्व हिंदू परिषदेच्यावतीने येथील एकवीरा देवी मंगल कार्यालयात राममंदिर निर्माण आंदोलनातील ५१ कारसेवकांचे पूजन आणि स्वागत करण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल साहू, बंटी पारवानी, दिनेश सिंह, चेतन वाटणकर व बजरंग दलाचे सुरेश चिकटे, उमेश मोवाळे, विजय खडसे यासह पदाधिकारी आदी उपस्थित होते.
पालकमत्र्यांच्या निवासस्थानी युवक काँग्रेसचा जल्लोष
तिवसा : मोझरी येथील पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानातील राममंदिरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीरामाचे पूजन करून राममंदिर पायाभरणीबाबत जल्लोष केला. अयोध्या येथील राम मंदिराच्या पायाभरणीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतील माती व विठ्ठल रुक्मिणीचे माहेरघर असलेल्या कौंडण्यपूर येथील वशिष्ठा नदीचे जल नेण्यात आले. त्यामुळे तिवसा तालुक्याचे या रामपर्वाशी ऋणानुबंध जुळले आहेत. त्यादृष्टीने मोझरीतील राम मंदिर फुलांनी सजविण्यात आले. दिव्याची आरास करण्यात आली. लाडुवाटपसुद्धा करण्यात आले. याशिवाय घरांपुढे रांगोळी, तर चौकाचौकांत फिजिकल डिस्टन्सिंग पाळून श्रीराम प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी तिवस्याचे नगराध्यक्ष वैभव वानखडे, नगरसेवक सचिन गोरे, योगेश वानखडे, उमेश राऊत, अंकुश देशमुख, सागर राऊत, जितू अडसपुरे, रोशन ठाकरे, गोरव ढोरे, ऋषीकेश ढोरे, आशिष तातोडे, यज्ञेश तिजारे आदी उपस्थित होते.