ट्रॉली उलटून ट्रॅक्टरचालक ठार; शिरजगाव कसबातील घटना

By प्रदीप भाकरे | Updated: March 21, 2023 14:06 IST2023-03-21T14:02:21+5:302023-03-21T14:06:57+5:30

गावकऱ्यांनी महत्प्रयासाने त्याला ट्रॉलीखालून बाहेर काढले. त्याला तातडीने दवाखन्यात हलविण्यात आले.

Trolley overturns, tractor driver killed | ट्रॉली उलटून ट्रॅक्टरचालक ठार; शिरजगाव कसबातील घटना

ट्रॉली उलटून ट्रॅक्टरचालक ठार; शिरजगाव कसबातील घटना

अमरावती : भरधाव ट्रॅक्टर ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात चालक ठार झाल्याची घटना शिरजगाव कसबा येथे घडली. २० मार्च रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास झालेल्या या अपघातात चालक ट्रॉलीखाली आल्याने जागीच गतप्राण झाला.            

संजय ललसू इवने (३०, इंदिरानगर, शिरजगाव कसबा) असे मृताचे नाव आहे. संजय हा गवारीपुरा येथून विटभट्टीवर जात असताना त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. ती भरधाव ट्रॅक्टर ट्रॉली मातीच्या मोठ्या ढिगाऱ्यावर चढली. त्यामुळे ट्रॉली उलटून संजय हा ट्रॅक्टरवरून कोसळून ट्रॉलीखाली दबला. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाला.

गावकऱ्यांनी महत्प्रयासाने त्याला ट्रॉलीखालून बाहेर काढले. त्याला तातडीने दवाखन्यात हलविण्यात आले. मात्र तोपर्यंंत त्याचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून शिरजगाव कसबा पोलिसांनी २० मार्च रोजी रात्री १० च्या सुमारास अपघाताची व अपघाती मृत्यूची नोंद घेतली.

Web Title: Trolley overturns, tractor driver killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.