परतवाड्यात ट्रकने सायकलस्वारास चिरडले

By Admin | Published: April 10, 2016 12:14 AM2016-04-10T00:14:43+5:302016-04-10T00:14:43+5:30

सायकलने गवंडी कामावर जाण्यास निघालेल्या मजुराला भरधाव ट्रकने चिरडले. शहरातील जयस्तंभ चौकात शनिवारी सकाळी १० वाजता ही घटना घडली.

The truck collided with the truck in the backyard | परतवाड्यात ट्रकने सायकलस्वारास चिरडले

परतवाड्यात ट्रकने सायकलस्वारास चिरडले

googlenewsNext

चालक पसार : जयस्तंभ चौकानजीकची घटना
परतवाडा : सायकलने गवंडी कामावर जाण्यास निघालेल्या मजुराला भरधाव ट्रकने चिरडले. शहरातील जयस्तंभ चौकात शनिवारी सकाळी १० वाजता ही घटना घडली. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला.
मो. राजीक शे. मेहबूब (२५, रा. मंजूरपुरा, अचलपूर) असे मृताचे नाव आहे. मो. राजीक सायकलने गवंडी कामासाठी निघाला होता. घरून निघाल्यावर जयस्तंभ चौकात येताच एमएच ३० एल ०८२९ या ट्रकने मो. राजीकच्या सायकलला जोरदार धडक दिली. यात राजीकचा जागीच मृत्यू झाला. परतवाडा पोलिसांनी मो. साबीर मो. हबीब यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविला.
अपघातानंतर अकोला, इंदूर, धारणी, बैतूलकडे जाणारी वाहतूक काही वेळासाठी बंद झाली होती. नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता.
शहरातील रस्ते चौपदरीकरण झाल्याने अमरावती-अचलपूर शहराकडे जाणारा मार्ग मोठा व परतवाडा शहरात व इंदूर, अकोला, चिखलदरा, धारणीकडे जाणारा मार्ग अरुंद झाला आहे. मधात मोठी जागा सुटल्याने पादचाऱ्यांसह सायकल, दुचाकीस्वारांची गोची होते. रस्ता चौपदरीकरणानंतर जयस्तंभ ‘शिवणी पार्क’ हटविण्याच्या हालचालीला आधी विरोध झाला होता, हे विशेष.

Web Title: The truck collided with the truck in the backyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.