तेंदुपत्ता नेणारा ट्रक वन कर्मचाऱ्यांनी सोडला
By admin | Published: June 5, 2016 12:05 AM2016-06-05T00:05:53+5:302016-06-05T00:05:53+5:30
व्याघ्र प्रकल्पातील तेंदुुपान भरून जाणाऱ्या ट्रकला गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक रवींद्र वानखडे ...
मिलिभगत : कंत्राटदाराचा आदेश
धारणी : व्याघ्र प्रकल्पातील तेंदुुपान भरून जाणाऱ्या ट्रकला गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक रवींद्र वानखडे यांनी पकडल्यानंतर कंत्राटदाराने मुख्य वनसंरक्षकांना फोन करून तोंडी आदेशानेच तो ट्रक सोडला. त्यामुळे तेंदुपान संकलनातील गौडबंगाल उघडकीस आला आहे.
हरिसाल व्याघ्र परिक्षेत्राधिकारी ए.आर. सुरत्ने यांनी तेंदुपान कंत्राटदारांना नोटीस बजावली होती. दिलेल्या मुदतीत कंत्राटदाराने कागदपत्रे सादर न करता संंकलन सुरूच ठेवले. या सर्व प्रक्रियेत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कार्यवाही न करण्याचा दबाव येत होता. चौराकुंड येथील संकलन केंद्रातील तेंदुपान बॅगमध्ये भरून ट्रकमध्ये घेऊन जात असताना गुगामलचे उपवनसंरक्षक रवींद्र वानखडे यांनी आरएफओ सुरत्नेसह ट्रक पकडले. कंत्राटदाराच्या माणसांनी केलेले कृत्य दाखविण्याचे धाडस ते करू शकले नाही. या प्रकारातून आपली सुटका करून घेण्यासाठी पुन्हा बड्या अधिकाऱ्याचा वापर झाल्याची माहिती आहे.