सामदा कासमपूर येथे धावता ट्रक पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 11:06 PM2019-02-27T23:06:35+5:302019-02-27T23:07:03+5:30

तालुक्यातील सामदा कासमपूर येथे दुपारी १ च्या सुमारास धावत्या ट्रकला आग लागली. आगीमुळे ट्रकमधील कापसाने पेट घेतल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, अज्ञात युवकांच्या दगडफेकीत जिनिंगचे व्यवस्थापक जखमी झाल्याचेही या घटनेत पुढे आले आहे.

A truck running at Samda Kasampur broke | सामदा कासमपूर येथे धावता ट्रक पेटला

सामदा कासमपूर येथे धावता ट्रक पेटला

Next
ठळक मुद्देलाखोंचा कापूस खाक : जिनिंगच्या व्यवस्थापकावर युवकांनी भिरकावले दगड

लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : तालुक्यातील सामदा कासमपूर येथे दुपारी १ च्या सुमारास धावत्या ट्रकला आग लागली. आगीमुळे ट्रकमधील कापसाने पेट घेतल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, अज्ञात युवकांच्या दगडफेकीत जिनिंगचे व्यवस्थापक जखमी झाल्याचेही या घटनेत पुढे आले आहे.
एमएच २८ एबी ६७३१ क्रमांकाच्या ट्रकमध्ये जैनपूर येथील जयकुमार गोविंद अढाऊ यांचा ७० क्विंटल आणि शुभम संतोष अढाऊ यांचा २० क्विंटल कापूस खरेदी करून दर्यापूर येथील सद्गुरू जिनिंगकडे व्यवस्थापकासह मंडळी निघाली होती. वाटेत सामदा कासमपूरच्या १०० मीटर अलीकडे कापसाने पेट घेतल्याचे ग्रामस्थांना दिसले. त्यांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला आणि लागोलाग अग्निशमन पथकाला कळविण्यात आले. यादरम्यान ट्रक पेटत असतानाच रस्त्याच्या कडेला असलेल्या घराजवळील कुटारानेही पेट घेतला. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती.
अग्निशमनपुढे पेच
ट्रक विझविण्यासाठी आलेल्या दर्यापूर नगरपालिकेच्या अग्निशमन वाहनाला प्रथमत: नागरिकांच्या गर्दीमुळे अलीकडे अडकावे लागले. त्यातच ग्रामस्थांनी आधी कुटाराला लागलेली आग विझविण्याचा धोशा लावल्याने अग्निशमन कर्मचाऱ्यांपुढे पेच निर्माण झाला; तथापि पेटत्या ट्रकच्या आगीचा धोका लक्षात घेऊन अग्निशमनच्या दोन बंबांनी प्रथम ही आग विझविली. येवदाचे ठाणेदार नितीन चरडे यांनी पंचनामा केला.
अज्ञातांची दगडफेक
ट्रकमुळे कुटाराला लागलेली आग गावात इतरत्र पसरू शकते, असा रोष व्यक्त करीत काही तरुणांनी ट्रकचालकाच्या केबिनकडे दगड भिरकावले. दगडफेकीत जिनिंगचे व्यवस्थापक प्रमोद मुळे व काही कर्मचारी जखमी झाले आहे. पोलीस पथक दाखल होताच हे अज्ञात युवक घटनास्थळाहून पळाले.

आगीच्या घटनेला वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार कारणीभूत आहे. अनेक गावांमध्ये जिवंत विद्युत तारा लोंबकळत असतात. मुख्य रस्त्यावरही हीच परिस्थिती असल्याने याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे.
- सुधाकर भारसाकळे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष, दर्यापूर

एकीकडे ट्रकमधील कापूस पेटत होता, दुसरीकडे गवत पेटून आग झपाट्याने गावाकडे पसरत होती. दगड मारल्याप्रकरणी पुढील चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
- नितीन चरडे,
ठाणेदार, येवदा पोलीस स्टेशन

Web Title: A truck running at Samda Kasampur broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.