सहकारातील निवडणुकांचा वाजला बिगूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:11 AM2021-01-14T04:11:49+5:302021-01-14T04:11:49+5:30

अमरावती : कर्जमाफी प्रक्रियेमुळे, आहे त्या टप्प्यावर स्थगिती देऊन पुढे ढकललेल्या १४ सहकारी संस्थांच्या निवडणुका आता १८ जानेवारीनंतर होणार ...

The trumpet of the co-operative elections | सहकारातील निवडणुकांचा वाजला बिगूल

सहकारातील निवडणुकांचा वाजला बिगूल

Next

अमरावती : कर्जमाफी प्रक्रियेमुळे, आहे त्या टप्प्यावर स्थगिती देऊन पुढे ढकललेल्या १४ सहकारी संस्थांच्या निवडणुका आता १८ जानेवारीनंतर होणार आहे. तसे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बुधवारी उशिरा दिले आहेत.

जिल्ह्यात डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ दिलेल्या अन्य ६३४ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. जानेवारी दरम्यान कर्जमाफी योजनेच्या प्रक्रियेत सहकारातील सर्व स्तरातील अधिकारी व कर्मचारी व्यस्त असल्यामुळे शासनाने निवडणूक प्रक्रिया सुरू झालेल्या संस्थांच्या निवडणुकीला आहे त्याच टप्प्यावर स्थगित करून पुढे ढकलल्या होत्या. त्यानंतर मार्च महिन्यात कोरोना संसर्गामुळे पात्र असलेल्या सहकारी संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलल्या. संचालक मंडळाला डिसेंबरअखेरपर्यंत तीन वेळा मुदतवाढ दिलेली आहे. अशा प्रकारातील ६४८ सहकारी संस्थांचा समावेश आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ सीबी व महाराष्ट्र सहकारी संस्था (निवडणूक) नियम २०१४ चे नियम ३ (पाच) अन्वये प्राप्त अधिकारानुसार मुदतवाढ देण्याचा अधिकार हा एक वर्ष कालावधीचा आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक आराखड्यातील प्रथम टप्प्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया (यात २५० व त्यापेक्षा कमी सभासद संख्या वगळून) सुधारित कार्यक्रमाप्रमाणे सुरू करण्याचे आदेशीत केले आहे.

कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे फिजिकल डिस्टन्स, प्रत्येकाने मास्क वापरणे, सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग आदी उपाययोजनांचा अवलंब व प्रतिबंधित उपाययोजनांचे पालन या निवडणुकांमध्ये बंधनकारक करण्यात आलेले आहे.

बॉक्स

या संस्थांची निवडणूक

अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, अमरावती, पुर्णा एग्रो बायोएंजन्सी सहकारी संस्था चांदूरबाजार, हरताळा सेवा सहकारी सोसायटी, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक व इतर कर्मचारी सहकारी पतसंस्था, वरुड, नवभारत कर्मचारी सहकारी पतसंस्था वरूड, वरुड संत्रा बागायतदार सहकारी समिती,अमरावती जिल्हा सहकारी बोर्ड, अमरावती जिल्हा ग्रामीण डाकसेवक सहकारी संस्था, हरिसाल आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, दुनी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, चाकर्दा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, ता. धारणी, नांदूरी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, ता. धारणी, बिजुधावडी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सहकारी संस्था. ता. धारणी व शिवपूर सेवा सहकारी संस्था, ता. चांदूर बाजार.

कोट

जिल्ह्यातील १४ सहकारी संस्थांची निवडणूक ज्या टप्प्यावर स्थगित केली, त्या टप्प्यापासून पुढची प्रक्रिया १८ जानेवारीपासून सुरू होईल. सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.

- संदीप जाधव,

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था

बॉक्स

सहा टप्प्यात होतील निवडणुका

निवडणुकांसाठी सहकार प्राधिकरणाद्वारा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. यात कोरोना, कर्जमाफी प्रक्रियेमुळे रखडलेल्या निवडणुका पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत संचालक व प्रशासकांची मुदत संपलेल्या संस्था, तिसऱ्या टप्प्यात १ जानेवारी ते ३१ मार्च २०२० पर्यंत मुदत संपलेल्या, चवथ्या टप्प्यात १ एप्रील ते ३० जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या संस्था, तर पाचव्या टप्प्यात १ जुलै तर ३० सप्टेंवर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या संस्था तर सहाव्या टप्प्यात १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या संस्थांचा समावेश आहे.

Web Title: The trumpet of the co-operative elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.