सरपंच, उपसरपंचपदाच्या निवड प्रक्रियेचा बिगुल वाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:23 AM2021-02-06T04:23:00+5:302021-02-06T04:23:00+5:30

अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया आटोपली असली तरी सरपंचपदाची निवडणूक अद्याप झालेली नसल्याने गावोगावी राजकीय ...

The trumpet of the selection process for the post of Sarpanch and Deputy Sarpanch sounded | सरपंच, उपसरपंचपदाच्या निवड प्रक्रियेचा बिगुल वाजला

सरपंच, उपसरपंचपदाच्या निवड प्रक्रियेचा बिगुल वाजला

Next

अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया आटोपली असली तरी सरपंचपदाची निवडणूक अद्याप झालेली नसल्याने गावोगावी राजकीय वातावरण तापत आहे. अशातच आता जिल्ह्यात ११ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत संबंधित ग्रामपंचायतींची सरपंच, उपसरपंचपदाच्या निवड प्रक्रियेसाठी पहिली सभा घेण्यात येणार आहे. यासाठी अव्वल कारकून व मंडळ अधिकाऱ्यांची अध्यासी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवार, ५ फेब्रुवारी रोजी जारी केले आहेत.

जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत २ व ४ फेब्रुवारीला १४ तालुक्यात पार पडली. त्यामुळे सरपंचपदाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. त्यामुळे गावोगावी सरपंचपदासाठी इच्छुक उमेदवारांना उत्सुकता लागली होती. परिणामी गावोगावी राजकीय डावपेचांना वेग आला आहे. काही गावांमध्ये एका पॅनेलला बहुमत असले तरी सरपंचपदाचा उमेदवार अन्य विरोधी पॅनेल जवळ असल्याने फोडोफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. याकरिता गावागावांत राजकीय नेते व पॅनेलप्रमुख वॉच ठेवून आहेत.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३० व ३३ नूसार व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील तरतुदीनूसार प्रक्रिया राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी १४ तहसीलदारांना दिले आहेत.

बॉक्स

अशी आहे तालुकानिहाय निवडणूक तारीख

भातकुली तालुक्यात ११ ते १६ फेब्रुवारी दरम्यान, तिवसा व चांदूर रेल्वे ११ ते १५, मोर्शी व अंजनगाव सुर्जी ११ ते १६, धारणी ११ ते १७, अमरावती, चांदूर बाजार, चिखलदरा, वरूड, अचलपूर व दर्यापूर ११ ते १७, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ११ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक होणार आहे.

बॉक्स

राजकीय घडामोडीना वेग

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया आटोपताच आता निवडणूक प्रक्रिया पार पडलेल्या ५५३ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाच्या निवड प्रक्रियेचे वेध लागले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी गावपुढाऱ्याच्या राजकीय व्युहरचना आखण्यासाठी घडामोडींना वेग आला आहे.

Web Title: The trumpet of the selection process for the post of Sarpanch and Deputy Sarpanch sounded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.