दोन विद्युत रोहित्र पेटविण्याचा प्रयत्न

By admin | Published: November 27, 2014 11:26 PM2014-11-27T23:26:03+5:302014-11-27T23:26:03+5:30

नवीन विद्युत रोहित्राअभावी शेतात ओलित करणे कठीण झाल्याने रबी पीकही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती आहे. येत्या २४ तासात नादुरूस्त रोहित्राऐवजी नवीन रोहित्र बसविण्याच्या मागणीसाठी

Try to lighten two electric lights | दोन विद्युत रोहित्र पेटविण्याचा प्रयत्न

दोन विद्युत रोहित्र पेटविण्याचा प्रयत्न

Next

बच्चू कडू यांचे आंदोलन : रोहित्रासाठी २४ तासांचा अल्टिमेटम्
ंचांदूरबाजार : नवीन विद्युत रोहित्राअभावी शेतात ओलित करणे कठीण झाल्याने रबी पीकही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती आहे. येत्या २४ तासात नादुरूस्त रोहित्राऐवजी नवीन रोहित्र बसविण्याच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी गनिमी काव्याने गुरूवारी आंदोलन करून मासोद-तुळजापूर मार्गावरील दोन रोहीत्र ताब्यात घेतले. हे रोहित्र पेटविण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांचा गोंधळ उडाला.
अचलपूर उपविभागातील शेतकरी समस्या निवारण्यासाठी व महावितरणाच्या निकामी रोहीत्र बदलून देण्यासाठी आमदार कडू यांनी यापूर्वी विभागीय आयुक्तालयात टेंभा आंदोलन केले होते. तेव्हा विभागीय आयुक्तासमोर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात पर्यायी रोहीत्र बसवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची पूर्तता न झाल्यामुळे आमदार कडू यांनी आपल्या ४०० ते ५०० कार्यकर्ते व शेतकऱ्यासमवेत ग्रामीण परिसरातल रोहीत्र ताब्यात घेण्याचा सपाटा चालविला. यावेळी त्यांनी या रोहित्राला पेटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी निकामी रोहीत्रामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी स्वत:ला डिपी शेजारील विजेच्या खांबाला बांधून घेतले होते तर प्रहार कार्यकर्त्यांनी दोन शाखा अभियंत्यांनाही ताब्यात घेतले.
हरबऱ्याला पाणी देता आले नाही म्हणून हिरुर व जालनापूरच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या परिसरात १५० रोहित्र निकामी आहे. सध्या ६३ के. व्ही. ए. च्या रोहित्रावर २२ जोडण्या दिल्या गेल्या आहे. वास्तविक यावर १० जोडण्या देणे आवश्यक आहे. त्यामुळे १०० के. व्ही. ए. चे रोहित्र मिळावे, तसेच नवीन रोहित्राकरिता अतिरिक्त पैशाची मागणी करू नये,यासाठी येत्या २४ तासाचा अल्टीमेटम बच्चू कडू यांनी दिला आहे.

Web Title: Try to lighten two electric lights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.