राज्यातील वीजदर कमी करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 01:07 AM2018-12-07T01:07:01+5:302018-12-07T01:07:35+5:30
राज्यात एकूण २ कोटी ४५ लाख विद्युत ग्राहक आहेत. हे राज्य यापूर्वीच भारनियमनमुक्त जाहीर करण्यात आले. आता ग्राहकांना अत्याधुनिक सेवा देणे हे कंपनीचे उद्दिष्ट राहील. विजेचे दर नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न सुरू असून, त्याकरिता तिन्ही कंपन्या कामाला लागल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यात एकूण २ कोटी ४५ लाख विद्युत ग्राहक आहेत. हे राज्य यापूर्वीच भारनियमनमुक्त जाहीर करण्यात आले. आता ग्राहकांना अत्याधुनिक सेवा देणे हे कंपनीचे उद्दिष्ट राहील. विजेचे दर नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न सुरू असून, त्याकरिता तिन्ही कंपन्या कामाला लागल्या आहेत. २२ आॅक्टोबरला राज्यात एकाच दिवशी २४ हजार ९०० मेगावॅट विजेच्या मागणीचा विक्रम नोंदविला गेल्याचा उल्लेखही त्यांनी केला. त्या दृष्टीने जेवढी मागणी आहे, तेवढीच वीजनिर्मिती करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे संचालक विश्वास पाठक यांनी दिली. त्यांनी रविवारी विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. महावितरणने केलेल्या चार वर्षांतील प्रगतीचा लेखाजोखा त्यांनी यावेळी मांडला. महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, मुख्य अभियंता सुचित्रा गुजर, अधीक्षक अभियंता सुहास मेहत्रे, अधीक्षक अभियंता (पायाभूत आरखडा) अनिल वाकोडे आदी यावेळी उपस्थित होते.