समाजाच्या उत्थानासाठी प्रयत्न
By admin | Published: May 2, 2017 12:44 AM2017-05-02T00:44:40+5:302017-05-02T00:44:40+5:30
शिक्षण हे प्रगतीचे माध्यम आहे. त्यामुळे तरूणांनी विविध ज्ञानशाखांत शिक्षण घेऊन यश मिळवावे.
पालकमंत्र्यांची उपस्थिती : कलाल समाजाचा मेळावा
अमरावती : शिक्षण हे प्रगतीचे माध्यम आहे. त्यामुळे तरूणांनी विविध ज्ञानशाखांत शिक्षण घेऊन यश मिळवावे. कलाल समाजातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याबरोबरच इतरही समाजहिताच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी दिले.
कलाल समाज संघटनेतर्फे समाज बांधवांचा मेळावा येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात रविवारी ३० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. त्याच्या उद्घाटनादरम्यान पालकमंत्री बोलत होते. यावेळी मध्यप्रदेशचे माजी आमदार रामदास शिवहरे, आनंद भामोरे, कलाल समाज संघटनेचे अध्यक्ष पी.बी.उके, गणेश राय, कैलास चौकसे, दिलीप सूर्यवंशी, सिल्लोडचे माजी नगराध्यक्ष नंदकिशोर सहारे, विश्वेश मालविय, आसाराम राय, फाल्गून उके, लक्ष्मीनारायण मालविय, सुंदरलाल राय, रामकृष्ण मेश्राम,अजय मालविय आदींची उपस्थिती होती.
मेळाव्यात समाजातील गुणवंत विद्यार्थी, खेळाडू, स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी, सैनिक, आदर्श शिक्षक आदींचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक माधव उके यांनी, तर संचालन सुभाष सहारे व आभार दिलीप सूर्यवंशी यांनी केले. मेळाव्याला समाज संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप सूर्यवंशी, सचिव दिलीप मानकर, रामकृष्ण मेश्राम, मनीष हटवार, एम.जे. उके, अशोक मेश्राम, बाळासाहेब सहारे, नअंबादास मानकर, नसुभाष सहारे, अनिल मानकर, दिलीप उके, अरूण शेंडे, हरिहर उके, नंदकिशोर लाळे, रवींद्र मेश्राम, रामराव मेश्राम आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)