रामपुरी कॅम्प येथे तुळशी विवाह थाटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 11:17 PM2017-11-01T23:17:18+5:302017-11-01T23:17:49+5:30

येथील रामपुरी कॅम्प परिसरातील काकी माँ मंदिरात तुळशी विवाह सोहळा बुधवार, १ नोव्हेंबर रोजी पार पडला.

In Tulsi marriage at Rampuri camp | रामपुरी कॅम्प येथे तुळशी विवाह थाटात

रामपुरी कॅम्प येथे तुळशी विवाह थाटात

Next
ठळक मुद्देसामाजिक उपक्रम : प्राप्त देणगीतून आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलींचे लावणार लग्न

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील रामपुरी कॅम्प परिसरातील काकी माँ मंदिरात तुळशी विवाह सोहळा बुधवार, १ नोव्हेंबर रोजी पार पडला. या सोहळ्यासाठी मिळालेल्या देणगीतून आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलींचे लग्न लावले जातील तसेच गरजूंना आवश्यकतेनुसार मदत करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
सिंधी बांधवांच्यावतीने गेल्या सहा वर्षांपासून अमरावतीत तुळशी विवाह सोहळा भव्य स्वरूपात साजरा केला जातो. यंदाच्या आयोजनात विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे यांचा सहभाग होता. याप्रसंगी युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, प्रणय कुळकर्णी, वैशाली धांडे, सुगनचंद गुप्ता, आशिष राठी, राजू राजदेव, राम मेठानी, दीपक वाधवानी, धावरदास मेघानी यांच्यासह इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. संपूर्ण रीतिरीवाजानुसार तुळशी विवाह पार पडला. उपस्थित नागरिकांच्या विवाहापश्चात जेवणावळी उठल्या. सोहळ्यात प्राप्त झालेल्या देणगीमधून सिंधी बांधव गरजूंना वर्षभर मदत करतात. तथापि, यंदा आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलींचे विवाह या देणगीतून लावण्यात येतील, असे विवाह सोहळ्याच्या आधी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. या घोषणेने विवाह सोहळ्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
सात दिवसीय उपक्रम
शनिवार, २८ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या या सोहळ्यात तुळशी विवाहापूर्वी सत्संग तसेच अनेक धार्मिक उपक्रम पार पडले. शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी सोहळ्याची सांगता होणार आहे.

Web Title: In Tulsi marriage at Rampuri camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.