तूर केंद्रांची मुदत संपली

By Admin | Published: June 11, 2017 12:01 AM2017-06-11T00:01:19+5:302017-06-11T00:01:19+5:30

केंद्र शासनाने मुदतवाढ दिलेल्या बाजार हस्तक्षेप योजनेची मुदत शनिवार १० जून रोजी संपल्याने शेतकऱ्यामसमोर नवे संकट उभे ठकले आहे.

Ture Center deadline ends | तूर केंद्रांची मुदत संपली

तूर केंद्रांची मुदत संपली

googlenewsNext

चार लाख क्विंटल पडून : टोकन दिलेल्या २० हजार शेतकऱ्यांची खरेदी केव्हा?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती-केंद्र शासनाने मुदतवाढ दिलेल्या बाजार हस्तक्षेप योजनेची मुदत शनिवार १० जून रोजी संपल्याने शेतकऱ्यामसमोर नवे संकट उभे ठकले आहे.पूर्वीच्या आदेशाने फक्त बाजार समिती यार्डातील ३१ मे पर्यतची आवक असलेली तूर खरेदी करण्यात येत आहे, सध्या पाच केंद्रांवरील तूर खरेदी संपली व उर्वरित केंद्रांवरील दोन दिवसात संपणार आहे. त्यामुळे टोकन दिलेल्या २० हजार शेतकऱ्यांची चार लाख ३९ हजार ७७८ क्विंटल तुरीची खरेदी केव्हा, हा प्रश्न कायम आहे.
जिल्ह्यासह राज्यात १० मेपासून केंद्र शासनाव्दारा पीएसएस योजनेद्वारे तूर खरेदी करन्यात आली.मात्र ही तूर खरेदी २६ मे रोजी बंद करण्यात आली.त्यामूळे राज्य शासनाचे वतीने बाजार हस्तक्षेप योजनेव्दारे खरेदी सुरू करण्यात आली, मात्र ही मुदत देखील ३१ मे रोजी संपल्याने लाखो व्किंटल तूर केंद्रांवर पडून होती. यामूळे शेतकरी संतप्त झाले.अखेर शासमाला उपरती झाली. राज्य शासनाव्दारा केंद्राला विंनती केल्यामुळे सर्व तूर खरेदी केंद्रांना १० जूनपर्यत मुदतवाढ देण्यात आली होती.

शेतकऱ्यांवर नवे संकट
अमरावती : या कालावधीत ३१ मे पूर्वी यार्डात असलेली तूर खरेदी व्हायची आहे. सद्यस्थितीत अंजनगाव, चांदूरबाजार, चांदूररेल्वे, धारणी व तिवसा केंद्रावरील तूर खरेदी करण्यात आली. अद्याप उर्वरित केंद्रांवरील व टोकन दिलेल्या मात्र शेकऱ्यांच्या घरी असलेल्या ४,३९,७७८ क्विंटल तुरीची खरेदी व्हायची आहे. त्यामुळे पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्रावर पीएसएस योजना सुरू झाल्यापासून म्हणजेच २७ मे पासुन आतापर्यत ९,३१० शेतकऱ्यांची १,७२,७०८ क्विंटल करण्यात आली. यामध्ये अचलपूर केंद्रावर २४,९९९ व्किंटल, अमरावती केंद्रावर २०,३१६ क्विंटल, अंजनगाव केंद्रावर १४,३९८ क्विंटल, चांदूर बाजार १२,२९२, चांदूर रेल्वे केंद्रावर ३३,९७२ क्विंटल, दर्यापूर केंद्रावर ७४,०५६ क्विंटल, धामणगाव केंद्रावर १६,०४३ क्विंटल, धारणी केंद्रावर १,१६४ क्विंटल, मोर्शी केंद्रावर ३८,९३१ व्किंटल, तिवसा केंद्रावर २१,४७३ क्विंटल, व वरूड केंद्रावर ७,७८० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. सद्यस्थितीत १२ ही तूर खरेदी केंद्रावर १९,७९५ शेतकऱ्यांची ४,३९,७७८ क्विंटल तूर खरेदी बाकी आहे. मृगास सुरूवात झालेली आहे. या पाश्वभूमीवर शेतीचे कामे करावी की तूर खरेदीचे आदेशाची प्रतीक्षा करावी, या विवंचनेत शेतकरी आहे.

अशी आहे केंद्रनिहाय तूर खरेदी बाकी
सद्यस्थितीत जिल्ह्यातील १२ केंद्रावर १९,७१५ शेतकऱ्यांची ४,३९,७७८ क्विंटल यूर खरेदी बाकी आहे. यामध्ये अचलपूर केंद्रावर १,७९५ शेतकऱ्यांची ३७,१५२ क्विंटल, अमरावती केंद्रावर ३,९७० शेतकऱ्यांची १,१९,९३० व्किंटल, अंजनगाव केंद्रावर २,१४० शेतकऱ्यांची ३५,६०७ क्विंटल, चांदूरबाजार केंद्रावर १,२३३ शेतकऱ्यांची २३,५११ क्विंटल, चांदूर रेल्वे केंद्रावर १,७६९ शेतकऱ्यांची ३३,९७२ क्विंटल, दर्यापूर केंद्रावर २,७३८ शेतकऱ्यांची ७४,०५६ क्विंटल, धामणगाव केंद्रावर ६४८ शेतकऱ्यांची १,६०,४३ क्विंटल, धारणी केंद्रावर ८४ शेतकऱ्यांची १,१६४ क्विंटल, मोर्शी केंद्रावर १,९८७ शेतकऱ्यांची ३८,१५४ क्विंटल, नांदगाव केंद्रावर १,९८७ शेतकऱ्यांची ३८,१५४ क्विंटल, तिवसा केंद्रावर ९४६ शेतकऱ्यांची २१,४७३ क्विंटल, तर वरूड केंद्रावर ५६१ शेतकऱ्यांची ७,७८० क्विंटल तूर खरेदी व मोजणी व्हायची आहे. यासाठी पुन्हा शासनाचे आदेश लागणार आहे. अन्यथा ही तूर खरेदीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या घरी पडून राहणार आहे.

बाजार समित्यांच्या आवारात ३१ मे पूर्वी जी तूर नोंद करण्यात आली ती तूर मुदती पश्चातही खरेदी करण्यात येणार आहे. अद्याप केंद्राला मुदतवाढीचे आदेश प्राप्त नाहीत.
- अशोक देशमुख,
जिल्हा मार्केटिंग अधिकारी

टोकन दिलेल्या २१ हजार शेतकऱ्यांची साडेचार लाख क्विंटल तुरीची खरेदी बाकी असल्याचा अहवाल शासनाला पाठविला आहे. मुदतवाढ मिळण्याच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.
- गौतम वालदे,
जिल्हा उपनिबंधक

Web Title: Ture Center deadline ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.