रेल्वेच्या अंडरपास मार्गातून अवजड वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 01:12 AM2018-03-23T01:12:46+5:302018-03-23T01:12:46+5:30

नरखेड-अमरावती रेल्वे मार्गावरील बेनोडा-लोणी रस्त्याने वाहतूक नियमित करण्यासाठी रेल्वेने बांधलेला भुयारी मार्गच या महत्त्वाच्या रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

Turn off heavy traffic from rail underpass | रेल्वेच्या अंडरपास मार्गातून अवजड वाहतूक बंद

रेल्वेच्या अंडरपास मार्गातून अवजड वाहतूक बंद

Next
ठळक मुद्देसदोष बांधकाम : बेनोडा-लोणी भुयारी मार्ग

ऑनलाईन लोकमत
बेनोडा : नरखेड-अमरावती रेल्वे मार्गावरील बेनोडा-लोणी रस्त्याने वाहतूक नियमित करण्यासाठी रेल्वेने बांधलेला भुयारी मार्गच या महत्त्वाच्या रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.
बेनोडा-लोणी मार्गाने लोणी परिसरातील सर्व गावांमध्ये एसटी बस फेऱ्या जातात. हा परिसर आणि आर्वी, आष्टी, पुलगाव, वर्धा येथून मोर्शी, चांदूरबाजार, परतवाडाकडे होणारी जड वाहतूक याच मार्गे होत असल्याने सतत वर्दळ असते. सोबतच मिझार्पूर येथील प्रसिद्ध गिट्टीखदानीतून गौणखनीज याच मार्गाने तालुक्यात पोहचविले जाते. या खदानीमुळे शासनाला कोट्यवधींचा महसूल प्राप्त होतो, हे विशेष.
नवनिर्मित नरखेड-अमरावती रेल्वेमार्गावर बेनोड्यापासून काही अंतरावर रेल्वेफाटक आहे. रेल्वेमुळे रस्ता वाहतुकीत होणारा खोळंबा संपविण्यासाठी रेल्वेने मोठा खर्च करून भुयारी मार्ग बांधला. मात्र, बांधकाम करताना जड आणि अवजड वाहनांचा विचार झाला नसल्याचे स्पष्ट होते. या मागार्साठी आजूबाजूची थोडी जमीन अधिग्रहित करून दोन्ही बाजूची वळणे वाहतूक सुलभ करणे अपेक्षित होते. तसे न करता काटकोनात वळणमार्ग ठेवल्याने जड वाहनांना वळण घेता येत नाही. त्यामुळे एकाचवेळी दोन वाहने भुयारी मार्गावर समोरासमोर आल्यावर वाहतूक कोंडी निर्माण होते. बांधलेल्या सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे दोन्ही बाजूस साईडपट्या भरून त्यांची दबाई केली नसल्याची नागरिकांची ओरड आहे. या सदोष बांधकामामुळे बेनोडा -लोणी पारंपरिक रस्त्याचे भवितव्य धोक्यात असल्याने नागरिकांत प्रचंड असंतोष आहे. भुयारी मार्गाच्या बांधकामाच्या दर्जावरून विकासकामे जनहीतासाठी की विकासकांच्या उपजीविकेसाठी, हा प्रश्न निर्माण होतो. त्याची चौकशी करून नागरिकांना या त्रासातून मुक्त करावे, अन्यथा रेल्वे प्रशासनाने जनतेच्या संतापाचा उद्रेक होण्याची वाट पाहू नये, असा इशारा पंचायत समिती सदस्य, तुषार निकम यांनी दिला.

Web Title: Turn off heavy traffic from rail underpass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.