वीज कडाडताच मोबाईल करा बंद ; झाडांपासून राहा दूर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:11 AM2021-07-17T04:11:33+5:302021-07-17T04:11:33+5:30
अमरावती : पावसाळा म्हटला की वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट हा एक भाग असतोच. वीज चमकताना मोबाईल बंद ...
अमरावती : पावसाळा म्हटला की वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट हा एक भाग असतोच. वीज चमकताना मोबाईल बंद करणे आवश्यक असून झाडाखाली थांबणेही धोक्याचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आकाशातील वीज पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. विशेष करून गुरांच्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून येते. पाऊस आला की रानातील गुरे ही पावसापासून बचावासाठी झाडाखाली थांबतात आणि नेमकी तेथेच वीज पडते. त्यामुळे गुरांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. अनेक ठिकाणी गुरांचे गोठे वृक्षाच्या सावलीचे दृष्टीने बांधलेली असतात.
बॉक्स
पाऊस पडल्याने झालेले मृत्यू
मनुष्यबळी जनावरांचा मृत्यू
२०१८ - ४-२०
२०१९ ४-५९
२०२० ८-६४
२०२१ १२ जुलै ४-२६
बॉक्स
कोणाला किती मिळाली नुकसान भरपाई
वीज पडून व्यक्तीचा मृत्यू झाला तर घटनास्थळाचा तहसील विभागामार्फत पंचनामा करण्यात येतो.
यानंतर मृत्यूच्या कुटुंबाला संपूर्ण शहानिशा झाल्यावर ४ लाख रुपयांची मदत दिली जाते.
या वर्षीचा अपवाद वगळला तर यापूर्वीच्या बहुतांश मृत्यू प्रकरणात मदत मिळाली आहे.
बॉक्स
वीज कडकडाट असताना ही घ्या काळजी
वीज कडाडताना नागरिक झाडाखाली सहारा घेतात. नेमकी वीज झाडावरच कोसळते कारण झाडाची मुळे पाण्याच्या दिशेने वाढत असतात. विजेला शांत होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे पाणी असणाऱ्या भागात वीज आकर्षित होते.
बॉक्स
जिल्ह्यात वीज अटकाव यंत्रणा किती
१) अमरावती जिल्ह्यात ८ वेगवेगळ्या ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
२) पापळ, शासकीय तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, व्हीएमव्ही काॅलेज, सहकार न्यायालय अमरावती, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह निंभाेरा.
३) आपत्ती निवारण विभागाकडून पावसाळा सुरू झाल्यावर सतर्कतेच्या सूचना दिल्या जातात.
कोट
हवामान बदलामुळे किंवा अन्य काही कारणांनी सध्या जो पाऊस येत आहे तो मुख्यत्वेकरून क्युम्युलोनिंबस या प्रकारच्या ढगापासून मिळत आहे. हे ढग गडगडाटासह आणि विजांसह वादळी पावसासाठी जबाबदार असतात. जेव्हा पावसाची झड असते त्यावेळी आकाशात निबोंस्ट्रॅंस या प्रकारचे ढग असतात जे शांतपणे बरसतात.
अनिल बंड, हवामान अभ्यासक